Join us  

सेन्सेक्स २७४ अंकांनी घसरला

By admin | Published: January 21, 2017 4:42 AM

गुंतवणूकदारांनी पाठ फिरविल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजार घसरले.

मुंबई : गुंतवणूकदारांनी पाठ फिरविल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजार घसरले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २७४.१0 अंकांनी अथवा १ टक्क्याने घसरून २७,0३४.५0 अंकांवर बंद झाला. १0 जानेवारी रोजी सेन्सेक्स या पातळीवर होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८५.७५ अंकांनी अथवा १.0२ टक्क्यांनी घसरून ८,३४९.३५ अंकांवर बंद झाला. अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय यांचे समभाग घसरले. याशिवाय अदाणी पोर्टस्, टाटा स्टील, एनटीपीसी, एलअँडटी, ओएनजीसी, हीरो मोटोकॉर्प, एमअँडएम यांचे समभागही घसरले. भारती एअरटेल, एशियन पेंटस्, आयटीसी, बजाज आॅटो, एचडीएफसी बँक यांचे समभाग वाढले. (वाणिज्य प्रतिनिधी)