मुंबई : वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकाबाबत सावध असलेल्या गुंतवणूकदारांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याने बुधवारी शेअर बाजारात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २८४ अंकांनी घसरून तीन आठवड्यांच्या नीचांकावर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८,६00 अंकांच्या खाली आला आहे. बाजारातील सूत्रांनी सांगितले की, जीएसटी विधेयक राज्यसभेत सादर झाले असले तरी, त्यावरील चर्चेतून काय निर्णय लागतो, याकडे बाजाराचे लक्ष आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. सकाळी सेन्सेक्स तेजीत होता. तथापि, नंतर तो घसरला. २८४.२0 अंकांची अथवा १.0२ टक्क्याची घसरण झालेला सेन्सेक्स २७,६९७.५१ अंकांवर बंद झाला. २१ जुलैनंतरची ही नीचांकी पातळी ठरली आहे. त्याआधी २४ जून रोजी सेन्सेक्स ६0४.६५१ अंकांनी घसरला होता. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्स २२६.८९ अंकांनी घसरला आहे. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी ७८.0५ टक्क्यांनी अथवा 0.९१ टक्क्याने घसरून ८,५४४.८५ अंकांवर बंद झाला. (प्रतिनिधी)
सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्स घसरला
By admin | Published: August 04, 2016 3:36 AM