मुंबई : भरीव कामगिरी आणि गुंतवणुकीवरील परतावा या दोन निकषांमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) प्रमुख जागतिक शेअर बाजाराच्या यादीत चौथ्या क्रमांकाचे मानाचे स्थान मिळविले आहे. हॉँगकॉँग, दक्षिण आफ्रिका, शांघायनंतर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आपला नंबर लावला आहे. या यादीत भारतीय शेअर बाजारातील एका प्रमुख निर्देशांकाने स्थान पटकाविल्यामुळे अनेक परदेशी वित्तीय गुंतवणूकदार आता भारतीय बाजारात सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत.
सप्टेंबर २०१३ पासून भारतीय शेअर बाजारात तेजी परतली आहे. यानंतर परदेशी वित्तीय संस्थांचा भारतीय बाजारातील वावर मोठ्या प्रमाणावर वाढला व या तेजीत या संस्थांनी विक्रमी गुंतवणूक केली आहे. मात्र, सप्टेंबपरच्या पहिल्या अमेरिकी फेडरलच्या व्याजदर कपातीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
भारतीय शेअर बाजारात सुरू असलेल्या या तेजीचे वैशिष्ट्य म्हणजे, मोठ्या, मध्यम आणि लघु भांडवली अशा सर्वच कंपन्यांच्या समभागांना मोठ्या प्रमाणवार मागणी असून या सर्वच कंपन्यांतून परदेशी वित्तीय संस्थांनी मोेठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.
सध्या जरी भारतीय कंपन्यांच्या समभांगात काही प्रमाणात नरमी असली तरी, भारतीय कंपन्यांच्या समभागांचे मूल्य हे सध्या काहीसे महागडेच मानले जात आहे. पण, आता सेन्सेक्सने जगातील चौथ्या क्रमांकाचा निर्देशांक म्हणून स्थान प्राप्त केल्यानंतर केवळ अमेरिकी आणि युरोपीयनच नव्हे तर जपान, जर्मनी आणि अन्य काही देशांतील वित्तीय संस्थाही आता भारतात सक्रिय होतील, असे मानले जात
आहे.
गेल्या आर्थिक वर्षात परदेशी वित्तीय संस्थांनी भारतीय शेअर बाजारात ४३ अब्ज ५० कोटी अमेरिकी डॉलरची गुंतवणूक केली आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहामहीत ३३ अब्ज २० कोटी अमेरिकी डॉलर इतकी गुंतवणूक परदेशी वित्तीय संस्थांनी केली असून आर्थिक वर्षाखेरीपर्यंत गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत किमान २९ टक्के अधिक गुंतवणूक होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
(प्रतिनिधी)
‘सेन्सेक्स’ चौथ्या क्रमांकाचा मानकरी
भरीव कामगिरी आणि गुंतवणुकीवरील परतावा या दोन निकषांमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) प्रमुख जागतिक शेअर बाजाराच्या यादीत चौथ्या क्रमांकाचे मानाचे स्थान मिळविले आहे.
By admin | Published: October 26, 2015 11:29 PM2015-10-26T23:29:57+5:302015-10-26T23:29:57+5:30