लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीच्या बळावर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी ६७.३५ अंकांनी म्हणजेच 0.२३ टक्क्यांनी सुधारून २९,९२६.१५ अंकांवर बंद झाला.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २८.७५ अंकांनी अथवा 0.३१ टक्क्यांनी वाढून ९,३१४.0५ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील ३0 पैकी २0 कंपन्यांचे समभाग वाढले. १0 कंपन्यांचे समभाग घसरले. बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग जोरदार उसळले. आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय, एचडीएफसी बँक यांना तेजीचा लाभ मिळाला. अंबुजा सिमेंट, एसीसी, लुपीन, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, ओएनजीसी, इन्फोसिस, सन फार्मा, टीसीएस, हीरो मोटोकॉर्प यांचे समभाग वाढले.
सेन्सेक्समध्ये सुधारणा, निफ्टी पुन्हा ९३00 अंकांवर
देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीच्या बळावर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी ६७.३५ अंकांनी म्हणजेच
By admin | Published: May 9, 2017 12:12 AM2017-05-09T00:12:52+5:302017-05-09T00:12:52+5:30