Join us

सेन्सेक्स १३२ अंकांनी वाढला

By admin | Published: November 09, 2016 6:51 AM

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी हिलरी क्लिंटन यांची निवड होण्याची शक्यता वाढल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे १३२ अंकांनी वाढला

मुंबई : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी हिलरी क्लिंटन यांची निवड होण्याची शक्यता वाढल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे १३२ अंकांनी वाढला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी वाढला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स १३२.१५ अंकांनी अथवा 0.४८ टक्क्यांनी वाढून २७,५९१.१४ अंकांवर बंद झाला. काल सेन्सेक्स १८४.८४ वाढला होता. निफ्टी ४६.५0 अंकांनी अथवा 0.५५ टक्क्यांनी वाढून ८,५४३.५५ अंकांवर बंद झाला. व्यापक बाजारातही तेजीचे वातावरण राहिले. बीएसई मिडकॅप 0.३६ टक्क्यांनी, तर स्मॉलकॅप 0.१६ टकक्यांनी वाढला. जपान वगळता अन्य आशियाई बाजारांत तेजीचे वातावरण राहिले. हाँगकाँगचा हँग सेंग 0.४७ टक्क्यांनी, तर शांघाय कंपोजिट 0.४६ टक्क्यांनी वाढला. जपानचा निक्केई मात्र, जवळ-जवळ सपाट पातळीवर बंद झाला. युरोपीय बाजारांत सकाळच्या सत्रात गुंतवणूकदार तेजी दर्शवित होते. लंडनचा एफटीएसई 0.१0 टक्क्यांनी, फ्रँकफूर्टचा डॅक्स-३0 हा 0.0५ टक्क्यांनी, तर पॅरिसचा कॅक-४0 हा 0.१५ टक्क्यांनी तेजी दर्शवित होता.सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 पैकी १८ कंपन्यांचे समभाग तेजीसह बंद झाले. १२ कंपन्यांचे समभाग मात्र घसरले. टाटा मोटर्सचा समभाग सर्वाधिक ६.४९ टक्क्यांनी वाढला. (प्रतिनिधी)