Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स १३६ अंकांनी उसळला

सेन्सेक्स १३६ अंकांनी उसळला

दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागल्यानंतर मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३६ अंकांनी वाढून २७,७८0.८३ अंकांवर बंद झाला.

By admin | Published: July 1, 2015 03:18 AM2015-07-01T03:18:10+5:302015-07-01T03:18:10+5:30

दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागल्यानंतर मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३६ अंकांनी वाढून २७,७८0.८३ अंकांवर बंद झाला.

Sensex gained 136 points | सेन्सेक्स १३६ अंकांनी उसळला

सेन्सेक्स १३६ अंकांनी उसळला

मुंबई : दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागल्यानंतर मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३६ अंकांनी वाढून २७,७८0.८३ अंकांवर बंद झाला. एफएमसीसी, आरोग्य, टिकाऊ ग्राहक वस्तू आणि धातू या क्षेत्रांत झालेल्या नव्या खरेदीच्या जोरावर शेअर बाजार वाढला.
आशियाई बाजारातील तेजी आणि ग्रीक पंतप्रधान अ‍ॅलेक्सीस सिपारा यांनी कर्ज संकटावर केलेले ‘शेवटच्या क्षणी तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्या’चे वक्तव्य यामुळे बाजाराला संजीवनी मिळाली.
सकाळी सेन्सेक्स २७,६२७.३९ अंकांवर मंदीने उघडला होता. त्यानंतर तो आणखी घसरून २७,५७0.९५ अंकांवर गेला. तथापि, नंतर त्यात सुधारणा झाली. सत्राच्या अखेरीस २७,७८0.८३ अंकांवर तो बंद झाला. १३५.६८ अंकांची अथवा 0.४९ टक्क्यांची वाढ सेन्सेक्सने मिळविली. गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्स २५0.८२ अंकांनी अथवा 0.९0 टक्क्यांनी घसरला होता.
स्मॉलकॅप आणि मीडकॅप निर्देशांक अनुक्रमे १.0७ टक्के आणि १.३३ टक्के वर चढले. छोट्या गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीचा लाभ त्यांना मिळाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा सीएनएक्स निफ्टी ५0.१0 अंकांनी अथवा 0.६0 टक्क्यांनी वाढून ८,३६८.५0 अंकांवर बंद झाला.
आशियाई बाजारात आज तेजीचे वातावरण होते.
चीनचा शांघाय कंपोजिट ५ टक्क्यांनी सुधारला. हाँगकाँग, तैवान, जपान, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया येथील बाजार 0.६३ ते १.0९ टक्के वाढले. युरोपीय बाजारांत मात्र घसरणीचा कल दिसून आला. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनचे बाजार सकाळी 0.९३ ते १.१७ टक्क्यांनी घसरणीचा कल दर्शवीत होते.
(वृत्तसंस्था)

१७३0 कंपन्यांचे समभाग तेजीत
१सेन्सेक्समधील कोल इंडियाचे समभाग सर्वाधिक ३.११ टक्क्यांनी वाढले. टाटा स्टील, लुपीन, सन फार्मा, एचयूएल, आयटीसी, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, एसबीआय, एचडीएफसी बँक यांचे समभाग वाढले. टीसीएस, विप्रो, गेल इंडिया, आयसीआयसीआय बँक, हीरो मोटोकॉर्प या कंपन्यांचे समभाग घसरले.
२बाजाराची एकूण व्याप्ती सकारात्मक राहिली. १,७३0 कंपन्यांचे समभाग वाढले. ९६0 कंपन्यांचे समभाग घसरले. १३१ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले.
३बाजारातील उलाढाल वाढून २,७१९.८६ कोटी झाली. आदल्या दिवशी ती २,५४५.६३ कोटी होती.

Web Title: Sensex gained 136 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.