मुंबई : शेअर बाजारात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९३ अंकांनी वाढून २८ हजार अंकांच्या वर गेला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,६00 अंंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला.
जून महिन्यातील कारखाना उत्पादन आणि ग्राहक निर्देशांकावर आधारित महागाईची आकडेवारी जाहीर होण्यापूर्वी बाजारात तेजी अवतरली. सेन्सेक्स २९२.८0 अंकांनी अथवा १.0५ टक्क्यांनी वाढून २८,१५२.४0 अंकांवर बंद झाला. ८,६७२.१५ अंकांवर बंद झालेला निफ्टी ८0 अंकांनी अथवा 0.९३ टक्क्यांनी वाढला. नफ्यात घसरण होऊनही एसबीआयचा समभाग ७.१६ अंकांनी वाढला. अॅक्सिस बँकेचा समभागही ३.९९ टक्क्यांनी वाढला. (प्रतिनिधी)
काही कंपन्यांची घसरण
- सेन्सेक्समधील ३0 पैकी २२ कंपन्यांचे समभाग वाढले. ८ कंपन्यांचे समभाग घसरले.
- घसरण सोसावी लागलेल्या बड्या कंपन्यांत इन्फोसिस, सिप्ला, सन फार्मा, एशियन पेंटस्, हिंदुस्तान युनिलिव्हर, डॉ. रेड्डीज, लुपीन, कोल इंडिया यांचा समावेश आहे.
सेन्सेक्स २९३ अंकांनी तेजाळला
शेअर बाजारात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९३ अंकांनी वाढून २८ हजार अंकांच्या वर गेला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा
By admin | Published: August 13, 2016 03:23 AM2016-08-13T03:23:31+5:302016-08-13T03:23:31+5:30