Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिलायन्सच्या कामगिरीचे बळ मिळाल्यामुळे सेन्सेक्स वाढला

रिलायन्सच्या कामगिरीचे बळ मिळाल्यामुळे सेन्सेक्स वाढला

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उत्साहवर्धक तिमाही आकडेवारीचे बळ मिळाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १५0 अंकांनी वाढून २७,३६४.९२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या

By admin | Published: October 20, 2015 03:42 AM2015-10-20T03:42:18+5:302015-10-20T03:42:18+5:30

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उत्साहवर्धक तिमाही आकडेवारीचे बळ मिळाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १५0 अंकांनी वाढून २७,३६४.९२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या

Sensex gained due to Reliance's performance | रिलायन्सच्या कामगिरीचे बळ मिळाल्यामुळे सेन्सेक्स वाढला

रिलायन्सच्या कामगिरीचे बळ मिळाल्यामुळे सेन्सेक्स वाढला

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उत्साहवर्धक तिमाही आकडेवारीचे बळ मिळाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १५0 अंकांनी वाढून २७,३६४.९२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही वाढ नोंदविली.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी २७,३0५.६२ अंकांवर तेजीसह उघडला. तेजीचा हा कल सेन्सेक्सने कायम राखला. एका क्षणी तो २७,३८७.९१ अंकांपर्यंत वर चढला होता. सत्राच्या अखेरीस १५0.३२ अंकांची अथवा 0.५५ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २७,३६४.९२ अंकांवर बंद झाला. २१ आॅगस्ट रोजी सेन्सेक्स २७,३६६.0७ अंकांवर बंद झाला होता. त्यानंतरचा हा सर्वांत मोठा बंद ठरला आहे. गेल्या तीन सत्रांत मिळून ५८५ अंकांची वाढ सेन्सेक्सने मिळविली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३६.९0 अंकांनी अथवा 0.४५ टक्क्यांनी वाढून ८,२७५.0५ अंकांवर बंद झाला.
बीएसई आणि एनएसई या दोन्ही बाजारांच्या निर्देशांकावर रिलायन्स इंडस्ट्रीजचेच वर्चस्व राहिले. कंपनीचा समभाग सर्वाधिक ५.६१ टक्क्यांनी वाढून ९६३.४0 रुपये झाला. सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत कंपनीने ६,७२0 कोटी रुपयांचा नफा कमावला. हा कंपनीचा सर्वोच्च तिमाही नफा ठरला आहे. ३0 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्समधील १८ कंपन्यांचे समभाग वाढले. वाढीचा लाभ मिळालेल्या कंपन्यांत भारती एअरटेल, इन्फोसिस, सन फार्मा, डॉ. रेड्डीज आणि हीरो मोटोकॉर्प यांचा समावेश आहे. तेजीचे वातावरण असतानाही घसरण सोसावी लागलेल्या कंपन्यांत ओएनजीसी, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एलअँडटी, हिंदाल्को यांचे समभाग घसरले. त्यामुळे सेन्सेक्सची वाढ मर्यादित राहिली. छोट्या गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे स्मॉलकॅप निर्देशांक 0.७७ टक्क्यांनी, तर मीडकॅप निर्देशांक 0.६९ टक्क्यांनी वाढला.

Web Title: Sensex gained due to Reliance's performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.