Join us

सेन्सेक्सने मिळविला १६.८८ टक्के लाभ!

By admin | Published: April 01, 2017 12:47 AM

२0१६-१७ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे २७ अंकांनी वाढून

मुंबई : २0१६-१७ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे २७ अंकांनी वाढून २९,६२0.५0 अंकांवर बंद झाला. २0१६-१७ या वर्षात मात्र सेन्सेक्सने १६.८८ टक्के जास्त वाढ मिळविली आहे. या वर्षात गुंतवणूकदारांची संपत्ती २६ लाख कोटींनी वाढली.सरत्या वर्षात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने १८.५५ टक्क्यांची वाढ मिळविली आहे. या वर्षाच्या शेवटच्या दिवशी मात्र निफ्टी सपाट पातळीवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारात नोंदणी असलेल्या सर्व कंपन्यांची संपत्ती आता १२१ लाख कोटी झाली आहे. गेल्या वित्त वर्षाच्या समाप्तीच्या वेळी ती ९४.७५ लाख कोटी होती. सरत्या वित्त वर्षात सेन्सेक्सने ४,२७८.६४ अंकांची अथवा १६.८८ टक्क्यांची वाढ मिळविली. निफ्टीने १,४३५.५५ अंकांनी अथवा १८.५५ टक्क्यांची वाढ मिळविली.