Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स, सोन्याने गाठला ऐतिहासिक उच्चांक; सोन्याचा प्रति तोळा दर...

सेन्सेक्स, सोन्याने गाठला ऐतिहासिक उच्चांक; सोन्याचा प्रति तोळा दर...

शेअर बाजार पाेहाेचला ६८,९१८ अंकांवर; साेने गेले प्रतिताेळा ६३,८०५ रुपयांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 08:19 AM2023-12-05T08:19:06+5:302023-12-05T08:19:20+5:30

शेअर बाजार पाेहाेचला ६८,९१८ अंकांवर; साेने गेले प्रतिताेळा ६३,८०५ रुपयांवर

Sensex, gold hit historic highs; Stock market bullish | सेन्सेक्स, सोन्याने गाठला ऐतिहासिक उच्चांक; सोन्याचा प्रति तोळा दर...

सेन्सेक्स, सोन्याने गाठला ऐतिहासिक उच्चांक; सोन्याचा प्रति तोळा दर...

मुंबई : चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालात सत्ताधारी भाजपला बहुमत मिळाल्याने शेअर बाजारासह सोने बाजारातही उत्साहाचे वातावरण आहे. सोमवारी सेन्सेक्सने ६८,९१८.२२ अंकांच्या सार्वकालिक उच्चांक गाठला, तर सोन्याच्या दरानेही प्रति तोळा ६३,८०५ रुपयांचा आजवरचा सर्वाधिक दर गाठला.

दुसऱ्या तिमाहीत जीडीपी ७.६ टक्क्यांवर पोहोचल्याने भारतात परदेशी संस्थांच्या गुंतवणुकीत वाढ होण्याचा अंदाज आहे. १ डिसेंबरला परकीय संस्थांनी बाजारात १,५८९ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. अमेरिकी बाजार शुक्रवारी जोरदार तेजीत बंद झाले. आशियायी बाजारांमध्ये तेजी होती. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातील तेजीवर दिसून आला.

नववर्षांपूर्वी सोने ६५ हजारांवर पोहोचणार

नववर्षात सोन्याचे भाव ६५ हजारांवर जाणार असल्याचा अंदाज वर्तविला जात होता. इस्रायलने पुन्हा हल्ले तीव्र केल्याने त्याचा परिणाम सोने-चांदीच्या भावावर होत असून, त्यांचे भाव झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहेत. आतंरराष्ट्रीय पातळीवरील या घडामोडींमुळे वाढती मागणी लक्षात घेता नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच सोन्याचे दर ६५ हजारांचा पल्ला ओलांडणार असल्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे.

सोन्याच्या तेजीची ५ कारणे
२०२४ मध्ये जागतिक मंदीची शक्यता. 
चीनमधील रहस्यमय आजारामुळे घबराट. nलग्नाच्या हंगामामुळे मागणीत वाढ.
डॉलर इंडेक्समध्ये कमजोरी.
जगभरातील केंद्रीय बँकांकडून 
सोन्याची माेठ्या प्रमाणात खरेदी.

Web Title: Sensex, gold hit historic highs; Stock market bullish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.