मुंबई : सेन्सेक्सने मोठी उसळी घेतली असून आजपर्यंतचा सर्वाधिक आकडा पार केला आहे. आज 204 अंकानी उसळी घेत सेन्सेक्स 41,093.64 वर पोहोचला आहे. तर निफ्टी 12,123.75 अंकांवर पोहोचला आहे. आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, इन्फोसिस आणि एचडीएफसी ट्वीन यांच्या समभागांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
सकारात्मक जागतिक संकेत मिळाल्यामुळे भारतीय शेअर बाजारात सलग दोन दिवस मोठी वाढ पहायला मिळाली आहे. बीएसईचा सेन्सेक्स आणि एनएसईचे निफ्टीने बाजार खुला होताच ऐतिहासिक झेप घेतली. सेन्सेक्सने मंगळवारी सकाळी 41,120.28 स्तर गाठला. तर निफ्टीने 12,132.45 नवा स्तर गाठला.
सोमवारी सुभाष चंद्रा यांनी झी एन्टरटेन्मेंटच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने झीचे शेअर 7.98 टक्क्यांनी घसरले. तर यस बँक, टाटा स्टील, सन फार्मा, ओएनजीसी यांचे समभाग वाढलेले आहेत. तर भारती एअरटेलचे समभाग सर्वाधिक उतरलेले आहेत. पावर ग्रीड, एलटी, बजाज ऑटो, टीसीएस यांचे समभाग उतरले आहेत.
मंगळवारी सकाळी शेअर बाजार उघडल्यावर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य़ वाढले आहे. काल 71.72 वरून रुपया 71.68 वर पोहोचला आहे.
सेन्सेक्समध्ये सहभागी असलेल्या 30 कंपन्यांपैकी 23 कंपन्यांचे शेअर वाढल आहेत. तर निफ्टीच्या 50मध्ये सहभागी कंपन्यांपैकी 37 कंपन्या हिरव्या तर 13 कंपन्या लाल रंगामध्ये आहेत.
#Sensex crosses 41,000 mark, currently at 41,088 ; #Nifty at 12,120.55 pic.twitter.com/7CMyjcnFFT
— ANI (@ANI) November 26, 2019
मंगळवारी सकाळी शेअर बाजार उघडल्यावर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य़ वाढले आहे. काल 71.72 वरून रुपया 71.68 वर पोहोचला आहे.