मुंबई : वाहन विक्रीत वाढ झाल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी १०३ अंकांच्या तेजीसह दोन आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. बांधकाम क्षेत्रातील वृद्धीदरातील सुधारणा आणि वाहन विक्रीतील तेजीने बाजारातली मान्सूनची चिंता नाहीशी झाली. यामुळे बाजारात चांगली वाढ नोंदली गेली.
जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर परकीय निधीच्या मागणीमुळे देशी बाजारातील धारणेला बळ मिळाले. डिझेल,पेट्रोल तथा विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचा भाववाढी गुंतवणूकदारांनी गांभीर्याने घेतली आहे, अशा माहिती बाजार जाणकारांनी दिली.
मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअरचा सेन्सेक्स मुजबत संकेतांसह उघडला आणि दिवसअखेर १०२.५७ अंक किंवा ०.४० टक्क्यांच्या तेजीसह २५,५१६.३५ अंकांवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्सने २५,५७१.९० अंकांची दिवसाची उच्चांकी पातळी गाठली. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्स ४५३.६८ अंक किंवा ०.३१ टक्क्यांनी वधरला.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही २३.३५ अंक किंवा ०.३१ अंकांच्या वाढीसह ७,६३४.७० अंकांवर पोहोचला. वाहन, धातू, भांडवल सामान, बांधकाम कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी राहिली, तर आयटी, औषध आणि तेल शुद्धीकरण कंपन्यांचे शेअर घसरले.
मे महिन्यात पायाभूत उद्योगांचा वृद्धीदर कमी झाला. यामुळे आज बाजाराचा लाभ मर्यादित राहिला. याशिवाय चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत देशाची महसुली तूट २.४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी संपलेल्या जून महिन्यात वाहन बाजारात तेजी नोंदली. देशातील सर्वांत मोठी कार कंपनी मारूती सुझुकीचे शेअर ६.०१ टक्क्यांनी वधारले. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा या वाहन कंपनीच्या शेअरमध्येही ४.०३ टक्क्यांची वाढ नोंदली गेली. हिंदाल्को, मारूती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा, टाटा स्टील, हिंद युनिलिव्हर, सेसा स्टरलाईट, लार्सन अॅण्ड टुब्रो व आयसीआयसीआय बँक यांचे शेअरमध्ये वाढ नोंदली. (प्रतिनिधी)
वाहन विक्रीतील तेजीने शेअर बाजारही ‘सुसाट’
वाहन विक्रीत वाढ झाल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी १०३ अंकांच्या तेजीसह दोन आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.
By admin | Published: July 2, 2014 04:07 AM2014-07-02T04:07:13+5:302014-07-02T04:07:13+5:30