Join us

सेन्सेक्स झेपावला!, आशियाई बाजारातील तेजीने बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:40 AM

अमेरिकी अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्यामुळे, जागतिक व्यापार युद्धाची भीती निवळल्याने सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने दोन वर्षांतील सर्वांत मोठी उसळी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही जोरदार उसळला.

मुंबई : अमेरिकी अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्यामुळे, जागतिक व्यापार युद्धाची भीती निवळल्याने सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने दोन वर्षांतील सर्वांत मोठी उसळी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही जोरदार उसळला.सकाळी मजबुतीने उघडलेला सेन्सेक्स सत्राच्या अखेरीस ६१0.५५ अंकांच्या उसळीसह ३३,९१७.९४ वर बंद झाला. हा सेन्सेक्सचा एक आठवड्याचा उच्चांकी बंद ठरला, तर दोन वर्षांतील ही मोठी उसळी ठरली. १ मार्च २0१६ रोजी सेन्सेक्स ७७७.३५ अंकांनी उसळला होता. त्यानंतरचा सेन्सेक्सचा हा सर्वात मोठा लाभ ठरला. व्यापक आधारावरील निफ्टी १९४.५५ अंकांनी उसळून १0,४२१.४0 अंकांवर बंद झाला. निफ्टीमधील ५0 पैकी ४७ कंपन्यांचे समभाग उसळले.सेन्सेक्समधील भारती एअरटेल, आयटीसी, एनटीपीसी, टाटा स्टील, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँक, अदाणी पोर्टस्, ओएनजीसी, विप्रो, इंडसइंड बँक, एचडीएफसी, इन्फोसिस, एचयूएल, आरआयएल, एलअँडटी, सन फार्मा, कोटक बँक, डॉ. रेड्डीज, एचडीएफसी बँक, टीसीएस व एशियन पेंटस्चे समभाग तेजाळले. वाहन कंपन्यांचे समभाग जोरदार वाढले. टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉप, मारुती सुझुकी, एमअँडएम आणि बजाज आॅटो यांचे समभाग वाढले.>ही आहेत तेजीची कारणेगेल्या आठवड्याच्या अखेरीस अमेरिकेने जारी केलेल्या रोजगार अहवालात मजबूत कल दिसून आला. त्यामुळे जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीची जागा आर्थिक आशावादाने घेतली.आशियाई बाजारातील तेजीमुळे भारतीय बाजारांना बळ मिळाले. जागतिक बाजारातही तेजी आढळून आली.शांघाय, सिंगापूर, हाँगकाँग,जपान या आशियाई बाजारांसह युरोपातील बाजारांत तेजीचा जबरदस्त कल राहिला.व्यापार युद्धाची भीतीनिवळल्याचा मुख्य फायदाधातू क्षेत्राला मिळाला. दीर्घकालीन मागणी वृद्धी अंदाजही सकारात्मक राहिल्याचा फायदा या कंपन्यांना झाला. त्यामुळे सेन्सेक्सला बळ मिळाले.महागाईचा दर घसरणार असा अंदाज होता, त्यामुळेही सेन्सेक्सला बळ मिळाले.>आंध्र बँकेला फटका : सरकारी मालकीच्या आंध्र बँकेचे समभाग १४ टक्क्यांनी जास्त घसरून १४ वर्षांच्या नीचांकावर गेले. ५ हजार कोटींच्या एका कर्ज घोटाळ्यात बँकेच्या माजी संचालकाविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हा दाखल केल्यामुळे बँकेला फटका बसला आहे. गुजरातेतील स्टर्लिंग बायोटेक प्रा. लि. या कंपनीला बँकेने हे कर्ज दिले होते.

टॅग्स :निर्देशांक