मुंबई : अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमॉक्रटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यावर आघाडी घेतल्यामुळे, जगभरातील शेअर बाजारांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३४९ पेक्षा जास्त अंकांनी घसरून २७,५२७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११२ पेक्षा जास्त अंकांनी आपटला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स संपूर्ण दिवस नकारात्मक टापूतच होता. सत्राच्या अखेरीस ३४९.३९ अंकांची अथवा १.२५ टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २७,५२७.२२ अंकांवर बंद झाला. १७ आॅक्टोबरनंतरचा हा नीचांकी बंद ठरला. त्या दिवशी सेन्सेक्स २७,५२९.९७ अंकांवर बंद झाला होता. दरम्यान, गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्सने ६४.९0 अंक गमावले होते. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील निफ्टी ११२.२५ अंकांनी अथवा १.३0 टक्यांनी घसरून ८,५१४ अंकांवर बंद झाला. २१ जुलैनंतरचा हा नीचांकी बंद ठरला.
सेन्सेक्स ३४९ अंकांनी आपटला
डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमॉक्रटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यावर आघाडी घेतल्यामुळे, जगभरातील शेअर बाजारांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
By admin | Published: November 3, 2016 06:11 AM2016-11-03T06:11:04+5:302016-11-03T06:11:04+5:30