Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सची ४६५ अंकांनी घसरण

सेन्सेक्सची ४६५ अंकांनी घसरण

भारताने पाकव्याप्त काश्मिरात घुसून अतिरेकी तळ उद्ध्वस्त केल्यामुळे शेअर बाजारात घबराट पसरली असून, सेन्सेक्स ४६५ अंकांनी कोसळला आहे. गेल्या तीन महिन्यांतील

By admin | Published: September 30, 2016 02:46 AM2016-09-30T02:46:08+5:302016-09-30T02:46:08+5:30

भारताने पाकव्याप्त काश्मिरात घुसून अतिरेकी तळ उद्ध्वस्त केल्यामुळे शेअर बाजारात घबराट पसरली असून, सेन्सेक्स ४६५ अंकांनी कोसळला आहे. गेल्या तीन महिन्यांतील

The Sensex lost 465 points | सेन्सेक्सची ४६५ अंकांनी घसरण

सेन्सेक्सची ४६५ अंकांनी घसरण

मुंबई : भारताने पाकव्याप्त काश्मिरात घुसून अतिरेकी तळ उद्ध्वस्त केल्यामुळे शेअर बाजारात घबराट पसरली असून, सेन्सेक्स ४६५ अंकांनी कोसळला आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. पाकिस्तानातील शेअर बाजारही आज खूपच घसरला.
डॉलरच्या तुलनेत रुपयाही ४९ पैशांनी घसरला आहे. त्याबरोबर एका डॉलरची किंमत ६६.९५ रुपये झाली. तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकने उत्पादन कपातीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सकाळी सेन्सेक्स तेजीत होता. (प्रतिनिधी)

ही २४ जून नंतरची सर्वांत
मोठी घसरण ठरली. तसेच
२६ आॅगस्ट नंतरचा हा नीचांकी बंद ठरला. त्या दिवशी सेन्सेक्स २७,७८२.२५ अंकांवर बंद झाला होता. काल सेन्सेक्स ६९.११ टक्क्यांनी वाढला होता.

30 पैकी २९ कंपन्यांचे समभाग घसरले. अदाणी पोर्ट्स, सन फार्मा, गेल, टाटा स्टील, लुपीन, टाटा मोटर्स, आणि एसबीआय यांचे समभाग ५.0१ टक्यांपर्यंत खाली आले. टीसीएस या एकमेव कंपनीचे समभाग वाढले.

व्यापक बाजारांतही नरमाईचाच कल दिसून आला. बीएसई स्मॉल-कॅप ४.0२टक्क्यांनी, तर मीडकॅप ३.६0 टक्क्यांनी घसरला.

लष्करी कारवाईची बातमी आल्यानंतर बाजारात पडझडीला सुरु झाली. सत्राच्या अखेरीस ४६५.२८ अंकांची अथवा १.६४ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.

Web Title: The Sensex lost 465 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.