Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदी लाटेवर स्वार झालेला सेन्सेक्स जगरहाटीबरोबर तेवढाच घसरला

मोदी लाटेवर स्वार झालेला सेन्सेक्स जगरहाटीबरोबर तेवढाच घसरला

नरेंद्र मोदींच्या लाटेवर स्वार झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३० हजारापार जाऊन आला, परंतु...

By admin | Published: February 4, 2016 06:31 PM2016-02-04T18:31:07+5:302016-02-04T18:32:24+5:30

नरेंद्र मोदींच्या लाटेवर स्वार झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३० हजारापार जाऊन आला, परंतु...

Sensex lower than Narendra Modi wave | मोदी लाटेवर स्वार झालेला सेन्सेक्स जगरहाटीबरोबर तेवढाच घसरला

मोदी लाटेवर स्वार झालेला सेन्सेक्स जगरहाटीबरोबर तेवढाच घसरला

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - नरेंद्र मोदींच्या लाटेवर स्वार झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३० हजारापार जाऊन आला. परंतु त्यानंतरच्या काळात उद्योगजगताची सुमार कामगिरी आणि आर्थिक धोरणबदलाचा धीमा वेग यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह निमाला आणि सेन्सेक्स हळूहळू घसरत गुरुवारी बाजार बंद झाला तेव्हा २४,३३८ इतका खाली आला.
गेल्या काही दिवसांमध्ये तर सेन्सेक्स २४,१०० पेक्षा खाली म्हणजे नरेंद्र मोदींनी दिल्ली जिंकली त्यावेळच्या, १६ मे २०१४च्या २४,१२१ या पातळीपेक्षाही खालच्या पातळीवर आला होता.
भारतीय रुपयाही गेल्या महिन्यात एका डॉलरच्या तुलनेत ६८ या २९ महिन्यांच्या नीचांकावर आला होता. आजही एका डॉलरच्या तुलनेत रुपया ६७.८० इतका घसरलेला आहे.
ज्यावेळी नरेंद्र मोदींनी सुत्रे हातात घेतली त्यावेळी अपेक्षा होती की उद्योगांचे उत्पन्न वाढेल, उलट ते कमीच झालंय, असं मत एका तज्ज्ञानं व्यक्त केलं आहे.
खनिज तेलाच्या व धातुंच्या किमतीत झालेल्या घसरणीचा फटका मुलभूत उत्पादन क्षेत्राला बसला आहे, आणि या क्षेत्राकडून कर्जांची परतफेड होणार नाही या भीतीने बँकांच्या शेअर्सना मागणी नाहीये. सेन्सेक्समध्ये असलेल्या कंपन्यांमध्ये अर्ध्याअधिक कंपन्या बँका आणि कमॉडिटी क्षेत्रातल्या आहेत.
सलग दोन वर्षे कमी पाऊस झाला असून त्याचा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसला आहे. तर उत्पादन क्षेत्राची वाढ समाधानकारक नसल्यामुळे रोजगार निर्मिती थंडावली आहे.
मोदींची लाट आली त्यावेळी गुंतवणूकदारांनी प्रचंड विश्वासानं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. मोदी सरकारने पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली असली तरी त्याचे प्रतिबिंब अद्याप तरी बाजारात पडलेले नाहीये. त्यात भर म्हणजे जीएसटी हे विधेयक अजूनही संसदेत अडकून पडलेले आहे.
खनिज तेलाचे भाव पडल्यामुळे विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर काढून घेतली गेली. जर खनिज तेलाचे भाव ३० डॉलरपेक्षा कमी राहिले तर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण दिसणार नाही असे मत एका तज्ज्ञाने व्यक्त केले आहे.

Web Title: Sensex lower than Narendra Modi wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.