Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स, निफ्टीने गाठले नवीन उच्चांकी शिखर

सेन्सेक्स, निफ्टीने गाठले नवीन उच्चांकी शिखर

नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेला दिलेले शिफारसपत्र, परकीय वित्तसंस्था आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केलेली जोरदार खरेदी, विविध आस्थापनांकडून येत असलेले उत्साहवर्धक निकाल या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक तसेच राष्टÑीय शेअर बाजाराचा निफ्टी यांनी नवीन उच्चांकी झेप घेतली; मात्र सप्ताहाच्या अखेरीस झालेल्या मोठ्या विक्रीमुळे ही वाढ टिकून राहिली नाही.

By प्रसाद गो.जोशी | Published: August 13, 2018 12:56 AM2018-08-13T00:56:38+5:302018-08-13T00:58:13+5:30

नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेला दिलेले शिफारसपत्र, परकीय वित्तसंस्था आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केलेली जोरदार खरेदी, विविध आस्थापनांकडून येत असलेले उत्साहवर्धक निकाल या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक तसेच राष्टÑीय शेअर बाजाराचा निफ्टी यांनी नवीन उच्चांकी झेप घेतली; मात्र सप्ताहाच्या अखेरीस झालेल्या मोठ्या विक्रीमुळे ही वाढ टिकून राहिली नाही.

Sensex, new high peak reached by Nifty | सेन्सेक्स, निफ्टीने गाठले नवीन उच्चांकी शिखर

सेन्सेक्स, निफ्टीने गाठले नवीन उच्चांकी शिखर

Highlightsशेअर बाजार समालोचन

आंतरराष्टÑीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेला दिलेले शिफारसपत्र, परकीय वित्तसंस्था आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केलेली जोरदार खरेदी, विविध आस्थापनांकडून येत असलेले उत्साहवर्धक निकाल या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक तसेच राष्टÑीय शेअर बाजाराचानिफ्टी यांनी नवीन उच्चांकी झेप घेतली; मात्र सप्ताहाच्या अखेरीस झालेल्या मोठ्या विक्रीमुळे ही वाढ टिकून राहिली नाही.
बाजारामध्ये गतसप्ताह हा तेजीचा राहिला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३७७१४.७० असा वाढीव पातळीवर खुला झाला. त्यानंतर तो ३८०७६.२३ असा उच्चांकी तर ३७५८६.८८ नीचांकी गेला. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत ३१३.०७ अंशांनी (०.८ टक्के) वाढून ३७८६९.२३ अंशांवर बंद झाला. सप्ताहाच्या अखेरीस झालेल्या मोठ्या विक्रीमुळे निर्देशांक ३८ हजारांची पातळी राखू शकला नाही.
राष्ट्रीय शेअर बाजारातही सप्ताहामध्ये तेजीचे वातावरण बघावयास मिळाले. येथील निफ्टी या निर्देशांकाने सप्ताहामध्ये नवा उच्चांक (११४९५.२०) गाठल्यानंतर सप्ताहाच्या अखेरीस ६८.७० अंशांची (०.६ टक्के) वाढ नोंदवित तो ११४२९.५० अंशांवर बंद झाला. मिडकॅपमध्ये अवघी ३.२९ अंशांची वाढ होऊन तो १६२१०.१८ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅपमध्ये मात्र या सप्ताहात घट झाली. हा निर्देशांक ४९.३२ अंशांनी खाली येऊन १६७८४.२० अंशांवर बंद झाला.
आंतरराष्टÑीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्था ही आगामी काळामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यावर्षी ७.३ टक्के तर पुढील वर्षामध्ये ७.५ टक्क्यांनी ती वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे भारतीय
बाजार तेजीत होता. अमेरिका व अन्य देशांमधील व्यापारातील तणाव कायम असला तरी तो कमी
झाल्याने जगभरातील बाजार मंदीतच होते.
परकीय तसेच देशांतर्गत वित्तीय संस्थांनी गतसप्ताहामध्ये खरेदी केली. परकीय वित्तसंस्थांनी ९९२.१८ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली.
अवघ्या १० सत्रांमध्ये हजार अंशांची वाढ
गतसप्ताहामध्ये बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने ३८ हजार अंशांची पातळी ओलांडली. बाजाराच्या अवघ्या दहा सत्रांमध्ये निर्देशांकाने एक हजार अंशांची वाढ मिळविली आहे. बाजाराच्या इतिहासातील ही तिसरी जलद वाढ आहे. याआधी २४ ते २५ हजारांचा टप्पा हा सर्वात जलद म्हणजे (१३ ते १६ मे २०१४) तीन सत्रांमध्ये गाठला होता. त्यानंतर ३५ ते ३६ हजारांचा टप्पा पाच सत्रांमध्ये (१७ ते २३ जानेवारी २०१८) पूर्ण झाला होता.
मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाची सुरुवात १ जानेवारी १९८६ रोजी करण्यात आली. त्यावेळी बाजारामध्ये नोंदणीकृत असलेल्या ३० मोठ्या आणि सर्वाधिक उलाढाल होणाऱ्या आस्थापनांचा समावेश या निर्देशांकामध्ये करण्यात आला होता. या आस्थापना विविध क्षेत्रांमधील होत्या. दीपक मोहंती यांनी निर्देशांकाचे संक्षिप्त नाव म्हणून सेन्सेक्स या संज्ञेचा सर्वप्रथम वापर केला.

Web Title: Sensex, new high peak reached by Nifty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.