मुंबई : बांधकाम क्षेत्रत थेट परकीय गुंतवणुकीचे नियम आणखी उदार करण्याचा निर्णय आणि अमेरिकी फेडरल रिझव्र्हद्वारा व्याज दर अजूनही खालच्या पातळीवर ठेवल्याने उत्साहित शेअर बाजारात आज नवे उच्चंक नोंदले गेले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 248 अंकांच्या भरारीसह 27,346.33 अंक या विक्रमी पातळीवर आला. बाजारात सलग तिस:या दिवशी तेजी नोंदली गेली आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसभरात 8,181.55 अंकांच्या अभूतपूर्व पातळीला स्पर्श केल्यानंतर अखेरीस 78.75 अंक वा क्.97 टक्क्यांनी तेजीसह 8,169.2क् अंकांवर बंद झाला. 8.173.9क् अंकांच्या विक्रमी पातळीहून हा काहीसा खाली राहिला. नवा भांडवल प्रवाह, कंपन्यांचे चांगले निष्कर्ष व भारताच्या पतमानांकनाबाबत मुडीजचा अनुकूल अहवाल यामुळे व्यापक पातळीवर मोठी मागणी झाल्याचे दिसून आले. मुंबई शेअर बाजारात 1,586 शेअर्स लाभात राहिले.
मुंबई शेअर बाजाराचा 3क् शेअर्सचा सेन्सेक्स तेजीसह उघडल्यानंतर दिवसभराच्या व्यवहारात 27,39क्.6क् अंक या विक्रमी पातळीवर पोहोचला. यापूर्वी सेन्सेक्सने 8 सप्टेंबर रोजी 27,354.99 अंक या विक्रमी पातळीवर गेला झाला होता. आज दिवसभरात सेन्सेक्स 248.16 अंक वा क्.92 टक्क्यांनी उंचावून 27,346.33 अंक या विक्रमी पातळीवर बंद झाला. तीन दिवसांत सेन्सेक्स 6क्क् अंकांनी उंचावला. यापूर्वी आठ सप्टेंबर रोजी सेन्सेक्स 27,319.85 अंकांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला होता.
सरकारने बुधवारी बांधकाम क्षेत्रत एफडीआय नियम आणखी उदार करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, किमान बांधकाम क्षेत्रशिवाय किमान विदेशी भांडवलाची मर्यादा कमी केली आहे. तसेच विदेशी गुंतवणूकदारांना प्रकल्पातून बाहेर पडण्यासाठीचे नियमही लवचीक करण्यात आले.