मुंबई : पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद करण्यात आल्यामुळे शेअर बाजारात सुरू झालेली घसरण गुरुवारी सलग चौथ्या सत्रात कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७१ पेक्षा जास्त अंकांनी घसरून सहा महिन्यांच्या नीचांकावर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८,१00 अंकांच्या खाली घसरला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स ७१.0७ अंकांनी अथवा 0.२७ टक्क्यांनी घसरून २६,२२७.६२ अंकांवर बंद झाला. २५ मे रोजी सेन्सेक्स २५,८८१.१७ अंकांवर बंद झाला होता. त्यानंतरचा हा नीचांकी बंद ठरला आहे. गेल्या चार दिवसांत सेन्सेक्स १,२९0.0६ अंकांनी अथवा ४.६९ टक्क्यांनी घसरला आहे. टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो या आयटी कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला. त्यांचे समभाग २.२0 टक्क्यांपर्यंत घसरले. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी ३१.६५ अंकांनी अथवा 0.३९ टक्क्यांनी घसरून ८,0७९.९५ अंकांवर बंद झाला. निफ्टी सहा महिन्यांनतर प्रथमच ८,१00 अंकांच्या खाली आला आहे. २६ मे २0१६ रोजी तो ८,0६९.६५ अंकांवर बंद झाला होता. त्यानंतरचा नीचांक आज ठरला.
आशियाई बाजारांत संमिश्र कल पाहायला मिळाला. चीन, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान येथील बाजार वर चढले. (प्रतिनिधी)
सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा गडगडले
पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद करण्यात आल्यामुळे शेअर बाजारात सुरू झालेली घसरण गुरुवारी सलग चौथ्या सत्रात कायम राहिली.
By admin | Published: November 18, 2016 01:57 AM2016-11-18T01:57:54+5:302016-11-18T03:45:25+5:30