मुंबई : अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या दोनदिवसीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारीही शेअर बाजारांत घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २१३ अंकांनी घसरून २७,0३९.७६ अंकांवर बंद झाला. सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदविणारा सेन्सेक्स दोन आठवड्यांच्या नीचांकावर आला आहे.
फेडरल रिझर्व्ह व्याजदर कायम ठेवण्याची शक्यता आहे. तथापि, व्याजदरांतील वाढ फेडरल रिझर्व्ह कधी करणार याचा काही धागा ‘फेड’च्या निर्णयातून मिळतो का, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. त्यासाठी त्यांनी हात आखडता घेतला आहे, असे ब्रोकरांनी सांगितले.
गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्स ४३१.0५ अंकांनी घसरला आहे. आशियाई बाजारांत संमिश्र कल पाहायला मिळाला. युरोपीय बाजार सकाळी वर चालले होते.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स सकाळी २७,१३१.७१ अंकांवर घसरणीसह उघडला होता. त्यानंतर तो आणखी घसरला. बँकिंग, पॉवर आणि रिअल्टी या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात विक्रीचा जोर दिसून आला. सत्राच्या अखेरीस २१३.६८ अंकांची अथवा 0.७८ टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २७,0३९.७६ अंकांवर बंद झाला. १५ आॅक्टोबर रोजी सेन्सेक्स या पातळीवर होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील एनएसई निफ्टी ८,२00 अंकांच्या खाली गेला. ६१.७0 अंकांची अथवा 0.७५ टक्क्याची घसरण नोंदवून निफ्टी ८,१७१.२0 अंकांवर बंद
झाला.
सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा घसरले
अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या दोनदिवसीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारीही शेअर बाजारांत घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २१३ अंकांनी घसरून २७,0३९.७६ अंकांवर बंद झाला
By admin | Published: October 28, 2015 09:57 PM2015-10-28T21:57:32+5:302015-10-28T21:57:32+5:30