Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद, आयटी आणि फार्मा शेअर्सना अमेरिकेतील महागाईचा फटका

सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद, आयटी आणि फार्मा शेअर्सना अमेरिकेतील महागाईचा फटका

बुधवारी शेअर बाजारातील कामकाजात तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स 278 अंकांच्या वाढीसह 71,833 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 03:52 PM2024-02-14T15:52:55+5:302024-02-14T15:53:12+5:30

बुधवारी शेअर बाजारातील कामकाजात तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स 278 अंकांच्या वाढीसह 71,833 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

Sensex Nifty closes higher IT and pharma shares hit by US inflation adani shares high share market india | सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद, आयटी आणि फार्मा शेअर्सना अमेरिकेतील महागाईचा फटका

सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद, आयटी आणि फार्मा शेअर्सना अमेरिकेतील महागाईचा फटका

Closing Bell Today : बुधवारी शेअर बाजारातील कामकाजात तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स 278 अंकांच्या वाढीसह 71,833 अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 106 अंकांच्या वाढीसह 21850 अंकांच्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारात निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी बँक निर्देशांकांनी वाढ नोंदवली तर, निफ्टी आयटी निर्देशांक घसरणीसब बंद झाला. 
 

बीपीसीएल, एसबीआय, ओएनजीसी आणि कोल इंडियाच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली, तर सर्वाधिक नुकसान झालेल्या शेअर्समध्ये टेक महिंद्रा, सिप्ला, डॉ रेड्डीज आणि इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता.
 

दरम्यान, शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात बरीच घसरण दिसून येत होती. बीएसई सेन्सेक्सनं बुधवारी 1000 अंकांची रिकव्हरी केली आणि दिवसाच्या नीचांकावरून बाजाराला वर आणण्याचा प्रयत्न केला. आशियाई शेअर बाजारातील कमकुवत कल पाहता भारतीय शेअर बाजारावरही त्याचा परिणाम दिसून येत होता.
 

कोणते शेअर्स वधारले / घसरले
 

बुधवारी पुन्हा एकदा एचडीएफसी बँक, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स, उर्जा ग्लोबल, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल या शेअर्समध्ये घसरण दिसून आली, तर एशियन पेंट्स, स्टोव्ह क्राफ्ट, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान झिंक, जिओ फायनान्शियल, महिंद्रा अँड महिंद्रा, यूपीएल, कोटक महिंद्रा. बँक, नेस्ले इंडिया, ओम इन्फ्रा, टाटा मोटर्स, ग्लोबस स्पिरिट, ब्रँड कॉन्सेप्ट, एक्साइड इंडस्ट्रीज, देवयानी इंटरनॅशनल, युनि पार्ट्स, टाटा स्टील, कामधेनू, ओएनजीसी, एनएमडीसी, इंजिनियर्स इंडिया, पंजाब अँड सिंध बँक आणि पटेल इंजिनीअरिंगच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
 

गौतम अदानी समूहाच्या 10 लिस्टेड कंपन्यांपैकी 9 कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते तर अदानी एनर्जी सोल्यूशनचे शेअर्समध्ये किंचित घसरण दिसून आली होती.

Web Title: Sensex Nifty closes higher IT and pharma shares hit by US inflation adani shares high share market india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.