Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर्स मार्केटची घोडदौड सुरुच! Axis, ICICI यासह 'या' शेअर्समध्ये आज उसळी; कोणते शेअर्स पडले?

शेअर्स मार्केटची घोडदौड सुरुच! Axis, ICICI यासह 'या' शेअर्समध्ये आज उसळी; कोणते शेअर्स पडले?

Share Market Today: सलग दुसऱ्या आठवड्यात शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. यामध्ये अनेक गुंतवणूकदारांनी मोठा कमावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 04:38 PM2024-09-16T16:38:09+5:302024-09-16T16:38:54+5:30

Share Market Today: सलग दुसऱ्या आठवड्यात शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. यामध्ये अनेक गुंतवणूकदारांनी मोठा कमावला.

sensex nifty closes in green due to buying in banking energy stocks bse market cap hits all time high of 470 lakh crore rupees | शेअर्स मार्केटची घोडदौड सुरुच! Axis, ICICI यासह 'या' शेअर्समध्ये आज उसळी; कोणते शेअर्स पडले?

शेअर्स मार्केटची घोडदौड सुरुच! Axis, ICICI यासह 'या' शेअर्समध्ये आज उसळी; कोणते शेअर्स पडले?

Stock Market Closing On 16 September 2024 : जगभरात मंदिचे सावट असताना भारतीय शेअर बाजार दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांना शेअर्सने नाराज केलं नाही. शेअर बाजाराच्या प्राथमिक आणि दुय्यम दोन्ही बाजारांसाठी आजचा दिवस अतिशय ऐतिहासिक ठरला आहे. प्राथमिक बाजारात बजाज हाऊसिंग फायनान्स आयपीओची बंपर लिस्टिंग होती. त्यामुळे दुय्यम बाजारात BSE सेन्सेक्स आणि MSE निफ्टी हे दोन्ही ऐतिहासिक उच्चांक गाठण्यात यशस्वी ठरले आहेत.

आजच्या व्यवहारात बँकिंग आणि एनर्जी शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. बाजार बंद झाल्यानंतर बीएसई सेन्सेक्स ९८ अंकांच्या उसळीसह ८२,९८९ अंकांवर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २७ अंकांच्या उसळीसह २५,३८४ अंकांवर बंद झाला. यामध्ये कोणते शेअर्स चढले आणि कोणते कोसळले याचा आढावा.

मार्केट कॅप विक्रमी पातळीवर
भारतीय शेअर बाजारातील जोरदार वाढीमुळे बाजार भांडवलाने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. बीएसईवर लिस्टिंग शेअर्सचे मार्केट कॅप ४७०.४९ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर बंद झाले आहे, जे मागील सत्रात ४६८.७१ लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात बाजाराच्या भांडवलात १.७८ लाख कोटी रुपयांची झेप घेतली आहे.

कोणत्या शेअर्सने केलं कंगाल?
सेन्सेक्समधील ३० शैअर्सपैकी १५ स्टॉक्स वाढीसह आणि १५ शेअर्स तोट्यासह बंद झाले. तर निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २५ वाढीसह आणि २५ तोट्यासह बंद झाले. वाढत्या शेअर्समध्ये एनटीपीसी २.४४ टक्के, एलअँडटी १.३५ टक्के, ॲक्सिस बँक ०.९७ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.९४ टक्के, नेस्ले ०.७२ टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.६६ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. बजाज फायनान्स 3.36 टक्के, एचयूएल 2.30 टक्के पडून बंद झाले.
 

Web Title: sensex nifty closes in green due to buying in banking energy stocks bse market cap hits all time high of 470 lakh crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.