मुंबई : कर आकारणीबद्दलच्या काळजीतून विदेशी कंपन्यांनी सोमवारी आक्रमकपणे शेअर्स विकल्याचा परिणामी शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५५६ अंकांनी घसरून २७,८८६.२१ वर आला. गेल्या तीन आठवड्यांतील हा नीचांक आहे. जागतिक पातळीवर निरूत्साह असल्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिकसारख्या मोठ्या कंपन्यांनी शेअर विकल्यामुळे बाजारावर दडपण आले होते.नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचेही (निफ्टी) १.८३ टक्के (१५७.९० अंक) नुकसान होऊन ८,५०० पेक्षा खाली घसरला व ८,४४८.१० अंकावर बंद झाला. याशिवाय आशियाच्या बाजारात घसरणीचा कल असल्यामुळे मार्चमध्ये निर्यात २१ टक्क्यांनी कमी होऊन गेल्या सहा वर्षांतील सगळ््यात कमी झाली. त्याचा परिणाम बाजारावर झाला. जागतिक ब्रोकरेज कंपनी युबीएसने निफ्टीच्या यावर्षी डिसेंबरपर्यंतच्या अंदाजाला कमी करून ९,२०० केले आहे. याआधी हा अंदाज ९,६०० अंकांचा होता. युबीएसचे म्हणणे असे आहे की आर्थिक वृद्धीबद्दलच्या काळजीमुळे आम्ही अंदाज कमी दाखविला आहे. मुंबई शेअर बाजारचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स ९५ अंक इतका मजबूत खुलल्यावर रियल्टी, एफएमसीजी आणि आयटी शेअर्समध्ये नफा मिळू लागल्यामुळे दिवसाच्या किमान पातळीवर तो २७,८०२.३७ अंकावर आला व शेवटी तो ५५५.८९ अंकासह (१.९५ टक्के घट) २७,८८६.२१ अंकावर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये लागोपाठ चौथ्या सत्रात घसरण झाली. गेल्या सोमवारी २९ हजार अंकांची पायरी ओलांडल्यानंतर सेन्सेक्स १,१६० अंक खाली आला आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी १५७.९० अंक (१.८३ टक्के) खाली येऊन ८,४४८.१० अंकांवर बंद झाला. व्यवहारात ८,४२२.७५ वरून ८,६१९.९५ अंकाच्या मर्यादेत राहिला. रेलिगेअर सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख हितेश अग्रवाल म्हणाले की जे काही परिणाम दिसतात त्यावरून आशा कमीच आहे; परंतु आर्थिक वृद्धीबद्दलच्या काळजीमुळे कंपन्यांच्या उत्पन्नात सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. सेन्सेक्सच्या ३० शेअर्समध्ये २८ नुकसानीचे ठरले. फक्त सन फार्मा व आयसीआयसी बँकच फायद्यात राहिली. (वृत्तसंस्था)
सेन्सेक्स, निफ्टी घसरले
By admin | Published: April 20, 2015 11:48 PM