Lokmat Money > बिझनेस न्यूज > सहा सत्रांच्या तेजीनंतर सेन्सेक्स, निफ्टी घसरले

सहा सत्रांच्या तेजीनंतर सेन्सेक्स, निफ्टी घसरले

सलग सहा सत्रांच्या तेजीनंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५३.०३ अंकांनी घसरून ३३,२१३.१३ अंकांवर बंद झाला. गेल्या सहा सत्रांत सेन्सेक्स ८७६.१९ अंकांनी वाढला होता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:37 AM2017-11-01T01:37:57+5:302017-11-01T01:38:16+5:30

सलग सहा सत्रांच्या तेजीनंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५३.०३ अंकांनी घसरून ३३,२१३.१३ अंकांवर बंद झाला. गेल्या सहा सत्रांत सेन्सेक्स ८७६.१९ अंकांनी वाढला होता.

Sensex, Nifty dropped after six sessions of gains | सहा सत्रांच्या तेजीनंतर सेन्सेक्स, निफ्टी घसरले

सहा सत्रांच्या तेजीनंतर सेन्सेक्स, निफ्टी घसरले

मुंबई : सलग सहा सत्रांच्या तेजीनंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५३.०३ अंकांनी घसरून ३३,२१३.१३ अंकांवर बंद झाला. गेल्या सहा सत्रांत सेन्सेक्स ८७६.१९ अंकांनी वाढला होता. राष्टÑीय शेअर बाजाराचा निफ्टी २८.३५ अंकांनी घसरून १०,३३५.३० अंकांवर बंद झाला. ३० कंपन्यांच्या सेन्सेक्समध्ये इन्फोसिसचे समभाग सर्वाधिक २.४३ टक्क्यांनी घसरले. डॉ. रेड्डीज, एम अँड एम, टाटा स्टील, एसबीआय, टाटा मोटर्स, एल अँड टी यांचे समभागही घसरले. वाढ मिळविणाºया कंपन्यांत अ‍ॅक्सिस बँक सर्वोच्चस्थानी राहिली. ओएनजीसी, भारती एअरटेल, हीरो मोटोकॉर्प, विप्रो आणि आयटीसी यांचे समभागही वाढले.


सोने, चांदी वाढले
नवी दिल्ली : अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीचा निर्णय लांबणीवर टाकला जाण्याची शक्यता वाढल्यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोने १०५ रुपयांनी वाढून ३०,३८० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. चांदीही २५० रुपयांनी वाढून ४०,२५० रुपये किलो झाली. फेडरल रिझर्व्हची दोनदिवसीय बैठक मंगळवारी सुरू झाली. महागाईचा दर वाढल्यामुळे फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली.

Web Title: Sensex, Nifty dropped after six sessions of gains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.