Join us  

Share Market Update: रिकामा गेला कोरोनाचा वार; सेन्सेक्स पहिल्यांदाच 55,000 पार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 5:24 PM

Share Market record High: अन्य आशियाई बाजारांमध्ये चीनच्या शांघाई कम्पोजिट, हाँगकाँगच्या हँगसेन, जपानच्या निक्की आणि दक्षिण कोरियाच्या कॉस्पी येथे घसरण नोंदविण्यात आली. त्याच्या उलट भारतात दिसले.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँकांच्या शेअरमध्ये मोठा वाढ झाल्याचा परिणाम सेंसेक्सवर देखील जाणवला. एवढा की 593 अंकांच्या वाढीने सेन्सेक्स पहिल्यांदाच 55,000 अंकाच्या वर बंद झाला. बीएसईचा 30 शेअरचा सेन्सेक्सने (Sensex) आज 1.08 टक्क्यांची झेप घेतली आणि 55,437.29 वर पोहोचला. हा सेन्सेक्सचा सर्वाधिक बंद होण्याचा उच्चांक आहे. (Sensex closes at record high, Nifty at 16,529; IT, metals gain)

Scrappage Policy benefits: स्क्रॅपिंग पॉलिसीचे फायदेच फायदे; जाणून घ्या वाहन मालकांना काय मिळणार...

आज दिवसभरात सेन्सेक्सने सर्वकालिन उच्चांकाला गवसणी घालत 55,487.79 चा आकडा गाठला होता. अशाचप्रकारे निफ्टीने (Nifty) देखील पहिल्यांदाच 16,500 अंकांच्या वर झेप घेतली. निफ्टीदेखील 164.70 अंकांनी उसळून म्हणजेच 1.01 टक्क्यांनी वाढून सर्वकालिन उच्चांक गाठला. सेन्सेक्समध्ये टीसीएसच्या शेअरने चांगली कामगिरी केली. सोबत लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, एचसीएल टेक, टाटा स्टील, बजाज ऑटो आणि रिलायन्सने देखील वाढ नोंदविली. 

उद्योगविश्वातील मोठी घडामोड! Godrej Industries च्या अध्यक्षपदावरून आदी गोदरेज पायउतार

अन्य आशियाई बाजारांमध्ये चीनच्या शांघाई कम्पोजिट, हाँगकाँगच्या हँगसेन, जपानच्या निक्की आणि दक्षिण कोरियाच्या कॉस्पी येथे घसरण नोंदविण्यात आली. दुपारच्या कामकाजात युरोपिय़ बाजारात सकारात्मकता दिसली. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट कच्चे तेल 0.10 टक्क्यांनी घसरून 71.24 डॉलर प्रति बॅरलवर आले. 

Tata vs Reliance: सुरु झाली लढाई! टाटांच्या कंपनीचे बाजारमुल्य रिलायन्सच्या नजीक येऊन ठेपले

टीसीएसची विजयी घोडदौड

देशातील सर्वाती मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) शुक्रवारी बीएसईवर 4 टक्क्यांची वाढ नोंदविली. यामुळे टीसीएसचा शेअर ऑल टाईम हाय 3,479.35 रुपयांवर पोहोचला आहे. याआधी या शेअरने 25 जूनला 3399 रुपयांची उंची गाठली होती. यामुळे टीसीएसचे बाजारमुल्य देखील 13 लाख कोटींच्या जवळ जाऊन पोहोचले आहे.

टॅग्स :शेअर बाजार