Join us  

Sensex-Nifty जोरदार घसरले; रेलटेलमध्ये बंपर तेजी, उज्जीवन एसएफबी घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 9:48 AM

चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स ७६८१८ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २३,३८२ अंकांवर उघडला.

चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स ७६८१८ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २३,३८२ अंकांवर उघडला. सोमवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांकात किंचित वाढ नोंदविली जात होती, तर इतर सर्व निर्देशांक घसरणीवर काम करत होते. 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात तेजी दाखवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये जीआरएससी, टिटागड वॅगन्स, रेलटेल, सुझलॉन एनर्जी, जेके पेपर, केएसईबी आणि बॉम्बे वर्मा या कंपन्यांच्या समभागांचा समावेश होता, तर मोतीलाल ओसवाल, स्वान एनर्जी, उज्जीवन एसएफबी, फॅक्ट, नाल्को, सेल, आरबीएल बँक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

पीएसयू शेअर्समध्ये बंपर तेजी

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या काळात सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ नोंदवली जात होती. एनएचपीसी, पॉवर ग्रिड, एसजेव्हीएन, भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, बीईएमएल, भारत डायनॅमिक्स, राइट्स लिमिटेड, आयआरसीटीसी, जीई शिपिंग, आयआरएफसी, वेस्ट कोस्ट पेपर, टॅक्स मेको रेल, रेल विकास निगम, माझगाव डॉक आणि रेलटेल या कंपन्यांचे शेअर्स वधारले, तर एनटीपीसी, कोल इंडिया, बीईएल, हिंदुस्थान पेट्रोलियम, एनएमडीसी, कंटेनर कॉर्पोरेशन, गेल आणि वॉर्ड विझार्ड इनोव्हेशन या कंपन्यांचे शेअर्स घसरले.

प्री ओपन मार्केटची स्थिती

सोमवारी प्री ओपन मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स ३०४ अंकांनी घसरून ७७९०६ अंकांवर तर निफ्टी १०८ अंकांनी घसरून २३,३९३ अंकांवर व्यवहार करत होता. सोमवारी शेअर बाजाराचं कामकाज घसरणीसह सुरू होऊ शकतं, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून देण्यात आले होते. चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आशियाई शेअर बाजारात संमिश्र कल पाहायला मिळाला.

टॅग्स :शेअर बाजार