मुंबई : बजेट विकासात्मक दृष्टी ठेवून मांडले जाईल अशी आशा व आर्थिक सुधारणा चालू राहतील अशा अपेक्षेने मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स सकारात्मक परिणाम गाठत १३८ अंकांनी वाढला असून, २५,९६२.०६ असा उच्चांकावर बंद झाला आहे. तेल व नैसर्गिक वायूचे समभाग आज उच्चीवर होते. परदेशी गुंतवणूकदारांनीही मोठ्या प्रमाणावर शेअर्स खरेदी केले. रिलायन्स इंडस्ट्रीज व एचडीएफसी बँकेच्या शेअर्सच्या वाढत्या किंमतीने आज निर्देशांकाच्या बढतीला आधार दिला. मान्सून लांबल्यामुळे महागाई वाढेल अशी भीती आता कमी झाली असून, अमेरिकी अर्थव्यवस्थाही सावरत आहे. तसेच तेलाच्या किंमतीही उतरत आहेत. सकाळी सुरुवातीला निर्देशांक २५,८४४.८० वर होता. दैनंदिन उलाढालीत तो २५,९८१.५१ पर्यंत वाढला. पण नंतर थोडासा खाली उतरुन २५,९६२.०६वर बंद झाला. यामुळे निर्देशांकात १३८.३१ अंकांची भर पडली आहे, ती ०.५४ टक्के आहे. केरोसीन व स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती वाढविण्याचा प्रस्ताव कॅबिनेट समितीसमोर लवकरच ठेवला जाणार असे अपेक्षित आहे, त्यामुळे तेल व नैसर्गिक वायूचे शेअर्स जोरदार विकले गेले. एनएसईचा ५० शेअर्सचा निर्देशांक ३६.८० अंकाने वाढला असून, सवरकालीन उच्चांकावर ७,७५१.६० पर्यंत वाढला आहे. (प्रतिनिधी)
सेन्सेक्स, निफ्टी यांचा उच्चांक
By admin | Published: July 05, 2014 5:44 AM