Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स निफ्टीची तेजीनं सुरुवात; SBI च्या शेअरमध्ये तेजी, एचडीएफसी लाईफ घसरला

सेन्सेक्स निफ्टीची तेजीनं सुरुवात; SBI च्या शेअरमध्ये तेजी, एचडीएफसी लाईफ घसरला

Stock Market Open: गुरुवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 159 अंकांनी वधारून 72311 अंकांच्या पातळीवर काम करत होता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 09:52 AM2024-02-08T09:52:39+5:302024-02-08T09:53:17+5:30

Stock Market Open: गुरुवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 159 अंकांनी वधारून 72311 अंकांच्या पातळीवर काम करत होता

Sensex Nifty off to a bullish start SBI shares rise HDFC Life falls share market up by 159 points | सेन्सेक्स निफ्टीची तेजीनं सुरुवात; SBI च्या शेअरमध्ये तेजी, एचडीएफसी लाईफ घसरला

सेन्सेक्स निफ्टीची तेजीनं सुरुवात; SBI च्या शेअरमध्ये तेजी, एचडीएफसी लाईफ घसरला

Stock Market Open: गुरुवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 159 अंकांनी वधारून 72311 अंकांच्या पातळीवर तर निफ्टी 54 अंकांनी वाढून 21984 अंकांच्या पातळीवर होता. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकांमध्ये वाढ दिसून आली. गुरुवारी, पुन्हा एकदा एसबीआय, ग्रासिम इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर एचडीएफसी लाईफच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
 

निफ्टी एफएमसीजी निर्देशांक गुरुवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात घसरणीसह कार्यरत होता. ट्रेंट, गो फॅशन, एंजेल वन, विजय डायग्नोस्टिक आणि चंबल फर्टिलायझर या शेअर्समध्ये कामकाजाच्या सुरुवातीला तेजी दिसून आली. स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जस्ट डायल, कॅप्री ग्लोबल, एस्कॉर्ट्स, ग्लेनमार्क फार्मा, पिरामल फार्मा आणि केपीआर मिल्सच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि यामध्ये बेयरिश मूव्हिंग एव्हरेज क्रॉसओव्हर तयार होत आहे, ज्यामुळे या शेअर्समध्येही घसरण दिसून येईल.
 

गुरुवारी प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये, बीएसई सेन्सेक्स 321 अंकांच्या वाढीसह 72473 अंकांच्या पातळीवर काम करत होता, तर निफ्टी 80 अंकांच्या वाढीसह 22009 अंकांच्या पातळीवर काम करत होता. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार GIFT निफ्टीनं सकाळच्या कामकाजादरम्यन 25 अंकांची वाढ नोंदवली होती, जी गुरुवारी शेअर बाजारात वाढ नोंदवू शकते.

Web Title: Sensex Nifty off to a bullish start SBI shares rise HDFC Life falls share market up by 159 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.