मुंबई : खरेदीचा जोर वाढल्यामुळे सोमवारी शेअर बाजार तेजाळला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २८ हजार अंकांच्या पार गेला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५ महिन्यांच्या उच्चांकावर गेला आहे.
सकाळी घसरण दर्शविणारा सेन्सेक्स २७,७३६.५१ अंकांपर्यंत खाली आला होता. तथापि, नंतर तो सावरला. सत्राच्या अखेरीस २९२.१0 अंकांच्या अथवा १.0५ टक्क्यांच्या वाढीसह तो २८,0९५.३४ अंकांवर बंद झाला.
१0 आॅगस्टनंतरची ही सर्वोच्च पातळी ठरली आहे. निफ्टी ९४.४५ अंकांनी अथवा १.११ टक्क्यांनी वाढून ८,६३५.६५ अंकांवर बंद झाला. गेल्या वर्षी १६ एप्रिलनंतरची ही सर्वोच्च पातळी ठरली आहे.
सूत्रांनी सांगितले की, ‘अडकून पडलेले वस्तू व सेवाकर विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, बाजारात उत्साहाचे वातावरण आहे, त्यामुळे खरेदी वाढली आहे.’ (प्रतिनिधी)
बाजाराची स्थिती
सेन्सेक्समधील मारुती सुझुकीचा समभाग सर्वाधिक ३.११ टक्क्यांनी वाढला, तर २.८६ टक्क्यांच्या वाढीसह एसबीआयचा समभाग दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
आशियाई बाजारांत संमिश्र कल पाहायला मिळाला. हाँगकाँगचा हँग सेंग 0.१३ टक्क्यांनी, तर चीनचा शांघाय कंपोजिट 0.१0 टक्क्यांनी वाढला. जपानचा निक्केई मात्र 0.0४ टक्क्यांनी घसरला. युरोपात सकाळी तेजीचे वातावरण होते. ब्रिटनचा एफटीएसई, पॅरिसचा कॅक आणि फ्रँकफूर्टचा डॅक्स तेजी दर्शवित होते.
सेन्सेक्स, निफ्टी वधारले
खरेदीचा जोर वाढल्यामुळे सोमवारी शेअर बाजार तेजाळला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २८ हजार अंकांच्या पार गेला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५ महिन्यांच्या उच्चांकावर गेला आहे.
By admin | Published: July 26, 2016 01:47 AM2016-07-26T01:47:51+5:302016-07-26T01:47:51+5:30