Join us

सर्वकालीन उच्चांक गाठून सेन्सेक्स-निफ्टी घसरले; मिड-स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 4:45 PM

Share Market Today : सेन्सेक्स 545 तर निफ्टी 134 अंकांनी घसरले.

Stock Market Closing On 29 July 2024 : आठवड्याचा पहिला दिवस(दि.29) शेअर बाजारासाठी चांगला ठरला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्सने 81,908 चा सार्वकालिक उच्चांक गाठला, मात्र नंतर प्रॉफिट बुकींगमुळे 81,355 वर बंद झाला. तर, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 25,000 अंकांच्या ऐतिहासिक उच्चांकाला स्पर्श करण्यापासून अवघ्या काही अंतरावर थांबला. निफ्टीने सुरुवातीला 24,999.75 चा सर्वकालीन उच्चांक गाठला, मात्र नंतर घसरुन 24,836 अंकांवर बंद झाला.

मार्केट कॅप 460 लाख कोटी रुपयांच्या पुढेसेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट नोटवर बंद झाले, पण मिडकॅप शेअर्सच्या दमदार वाढीमुळे मार्केटचे एकूण मूल्य 460 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप 460.14 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 456.92 लाख कोटी रुपये होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.22 लाख कोटी रुपयांची झेप होती. आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, फार्मा, धातू, रिअल इस्टेट, मीडिया, ऊर्जा, इन्फ्रा, हेल्थकेअर, तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्स वाढले, तर आयटी, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि एफएमसीजी शेअर्स घसरले. 

वाढणारे आणि घसरणारे शेअर्सआजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 पैकी 20 शेअर्स वाढीसह आणि 10 तोट्यासह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 पैकी 25 शेअर्स वाढीसह आणि 25 तोट्यासह बंद झाले. वाढणाऱ्या शेअर्समध्ये L&T 2.77%, Bajaj Finserv 2.24%, Mahindra & Mahindra 1.67%, UltraTech Cement 1.42%, SBI 1.05%, Reliance 0.76%, IndusInd Bank 0.73%, Sun Pharma 0.61%, Marj50%, Ba.50% , ICICI बँक 0.53 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर, घसरलेल्या शेअर्समध्ये Tital 2.38%, Airtel 2.22%, ITC 1.33 %, Tech Mahindra 1.07 % घसरणीसह बंद झाले.

 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक