मुंबई : मुंबई : काेविड-१९ विषाणूवर लस लवकर मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर दिसून आला. भारतीय शेअर बाजारांवरही याचा सकारात्मक परिणाम हाेऊन मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली. सेन्सेक्स ४४६अंशांनी वधारून ४४,५२३.०३ वर बंद झाला, तर निफ्टीने प्रथमच १३ हजारांचा टप्पा ओलांडला. निफ्टीने १२९ अंशांची झेप घेउन १३,०५५०१५ वर मजल मारली.
साहजिकच फार्मा कंपन्यांच्या शेअर्सची माेठ्या प्रमाणावर खरेदी झाली. त्याचप्रमाणे बॅंका आणि वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याकडे कल हाेता. परिणामी बॅंका आणि फार्मा कंपन्यांच्या शेअर्सचे दर चांगलेच वधारले. बॅंका, ऑटाेमाेबाइल तसेच वित्तीयसंस्थांच्या निर्देशांकांमध्ये सरासरी २ टक्के वाढ झाली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी माेठ्या प्रमाणावर खरेदी केली. त्याचाही परिणाम बाजारांवर दिसून आला.
खरेदीचा उत्साह
n सेन्सेक्सने दिवसभरात ४४,६०१ ही उच्चांकी पातळी गाठली हाेती, तर निफ्टीनेही १३,०७२ या पातळीला स्पर्श केला हाेता. काेराेनावर लस मिळण्यावरून आशावाद निर्माण झाला आहे. तसेच भारताला लस लवकर देण्याचेही काही कंपन्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मंदीचे सावट दूर हाेण्याच्या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला.