Join us

सेन्सेक्स-निफ्टीनं घेतला रॉकेट स्पीड; सोनं-चांदी धडाम! मोठी घसरण, पटापट चेक करा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 3:38 PM

एकीकडे सेन्सेक्सची 79000 च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. तर सोनं 71000 च्या जवळ येत आहे.

शेअर बाजारातील सेन्सेक्स-निफ्टीच्या तुलनेत सराफा बाजारात सोन्या चांदीची झळाळी फिकी पडल्याचे दिसत आहे. एकीकडे सेन्सेक्सची 79000 च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. तर सोनं 71000 च्या जवळ येत आहे. तर निफ्टी 23900 च्या जवळ पोहोचत आहे. तसेच चांदीचा विचार करता चांदी 1745 रुपयांनी घसरून 86570 रुपये प्रति किलोवर आली आहे. 

14 ते 24 कॅरेट सोन्याची आजची किंमत आयबीजेए नुसार, - - 24 कॅरेट सोन्याचा दर आज गेल्या 71739 रुपये या बंद भावाच्या तुलनेत प्रति 10 ग्रॅमवरून 487 रुपयांनी घसरून 71252 रुपयांवर आला आहे.- 23 कॅरेट सोन्याची किंमत 485 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन 70967 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली आहे. - 22 कॅरेट सोन्याची किंमतही 446 रुपयांनी घसरून 65267 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली आहे.- 18 कॅरेट सोन्याचा भाव 365 रुपयांनी स्वस्त होऊन 53439 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे.- 14 कॅरेट गोल्डचा भावही 285 रुपयांनी घसरून 41682 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे.- चांदीचा विचार करता, चांदीचा दरही 1745 रुपयांनी घसरला असून आज चांदी 86570 रुपयांवर आली आहे.

जीएसटीसह सोन्या-चांदीचा दर -- आज 23 कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह 73096 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाईल. तर इतर खर्चासह 80405 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास जाईल. - 22 कॅरेट सोन्याचा विचार करता, जीएसटी सह ते 67225 रुपयांपर्यंत आले आहे. तर, ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि नफ्यासह ते जवळपास 73947 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत मिळू शकते.- 18 कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह 55042 रुपयांवर आहे. ज्वेलरी मेकिंग चार्जस आदीचा विचा करता, ते 60546 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाते. तसेच, 24 कॅरेट सोन्याचा विचार करता, ते जीएसटीसह 73389 रुपये प्रति 10 ग्रॅमवर जाते. तर चांदी  जीएसटीसह 89167 रुपये प्रति किलो पर्यंत जाते. 

टॅग्स :सोनंशेअर बाजारचांदीगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी