मुंबई : स्टेट बँक आॅफ इंडियाची तिमाही कामगिरी उत्तम राहिल्यामुळे शेअर बाजारांत उत्साह संचारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २८९.८३ अंकांनी वाढून पुन्हा एकदा २९ हजार अंकांना पार करून गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा सीएनएक्स निफ्टी ८,८00 अंकांच्या पुढे गेला.
केंद्र सरकारचा आगामी अर्थसंकल्प सुधारणांना वाट मोकळी करून देणारा असेल, अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत. त्यामुळे बाजारात आधीच सकारात्मक वातावरण बनले आहे. सलग चौथ्या सत्रात बाजाराने तेजी साजरी केली आहे. एफएमसीजी, आरोग्य, बँकिंग, आॅटो आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांना तेजीचा लाभ झाला.
बीएसई सेन्सेक्स सकाळी तेजीसह २८,८८८.९९ अंकांवर उघडला. त्यानंतर तो वाढत २९,१५४.६७ अंकांवर गेला. सत्रअखेरीस २९,0९४.९३ अंकांवर बंद झाला. २८९.८३ अंक अथवा १.0१ टक्क्याची वाढ त्याने नोंदविली. गेल्या चार सत्रांपासून सेन्सेक्स वाढ दर्शवीत आहे. या चार दिवसांत ८६७.५४ अंक सेन्सेक्सने कमावले आहेत. ही वाढ ३0.0७ टक्के आहे.
५0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा सीएनएक्स निफ्टी ९३.९५ अंक अथवा १.0८ टक्का वाढीसह ८,८0५.५0 अंकांवर बंद झाला.
युरोपीय बाजारातही आज तेजीचा कल होता. युरोझोनची अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे संकेत आहेत. तसेच ग्रीसचे बेलआऊट पॅकेज अंतिम टप्प्यात आहे. त्याचा लाभ युरोपीय बाजारांना मिळाला. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन येथील बाजार 0.४८ टक्का ते 0.५७ टक्का वर चढलेले सकाळच्या सत्रात दिसत होते.
आशियाई बाजारातही तेजीचा कल दिसून आला. चीन, हाँगकाँग, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान येथील बाजार 0.२१ टक्का ते १.0७ टक्का वर चढले. (वृत्तसंस्था)
सेन्सेक्स पुन्हा एकदा २९ हजार पार
स्टेट बँक आॅफ इंडियाची तिमाही कामगिरी उत्तम राहिल्यामुळे शेअर बाजारांत उत्साह संचारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २८९.८३ अंकांनी वाढून
By admin | Published: February 14, 2015 12:57 AM2015-02-14T00:57:41+5:302015-02-14T00:57:41+5:30