Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स पुन्हा उसळला

सेन्सेक्स पुन्हा उसळला

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागल्यानंतर भारतीय शेअर बाजार शुक्रवारी पुन्हा एकदा उसळेल.

By admin | Published: September 27, 2014 07:03 AM2014-09-27T07:03:02+5:302014-09-27T07:03:02+5:30

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागल्यानंतर भारतीय शेअर बाजार शुक्रवारी पुन्हा एकदा उसळेल.

Sensex recovers | सेन्सेक्स पुन्हा उसळला

सेन्सेक्स पुन्हा उसळला

मुंबई : तीन दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागल्यानंतर भारतीय शेअर बाजार शुक्रवारी पुन्हा एकदा उसळेल. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १५८ अंकांनी उसळला. एसबीआय, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, टाटा स्टील आणि सन फार्मा यासारख्या कंपन्यांचे शेअर्स वर चढले.
प्रमुख तीन कारणांनी शेअर बाजाराने ही उसळी घेतली. एक म्हणजे स्टँडर्ड अँड पुअर्स या आंतरराष्ट्रीय रेटिंग संस्थेने भारताच्या क्रेडिट रेटिंगमध्ये केलेली सुधारणा होय. या संस्थेने भारताला निगेटिव्ह या रेटिंगमधून काढून स्टेबल म्हणजेच स्थिर या रेटिंगमध्ये टाकले आहे. उसळीला कारणीभूत ठरलेला दुसरा घटक म्हणजे रुपयाच्या मूल्यात झालेली वाढ होय. त्याच प्रमाणे युरोपीय बाजारातील उसळी हा भारतीय बाजाराला संजीवनी देणारा तिसरा घटक ठरला.
सकाळी बाजारात मरगळच होती. ३0 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेला सेंसेक्स २६,२२0.४९ अंकांपर्यंत खाली आला होता. त्यानंतर बाजार हळूहळू सावरू लागला. गमावलेले अंक प्राप्त करतानाच सेन्सेक्स वर चढला. दिवसअखेरीस १५७.९६ अंकांची म्हणजेच 0.६0 अंकांची वाढ नोंदवून सेंसेक्स २६,६२६.३२ अंकांवर बंद झाला. एका क्षणी सेंसेक्स २६,७२१.0३ अंकांपर्यंत वर चढला होता.
गेल्या तीन व्यावसायिक सत्रांत सेंसेक्सने ७३८.३८ अंक गमावले होते. जागतिक बाजारातील कमजोर स्थिती आणि सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले खाणपट्ट्यांचे वितरण यामुळे सेन्सेक्स घसरणीला लागला होता.
५0 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेल्या निफ्टीनेही आज झेप घेतली. ५७ अंकांची म्हणजेच 0.७२ अंकांची वाढ नोंदवून निफ्टी ७,९६८.८५ अंकांवर बंद झाला. दिवसभर तो ७,८४१.८0 ते ७,९९३.३0 अंकांच्या मध्ये खालीवर होताना दिसून आला.
स्टँडर्ड अँड पुअर्सने भारताच्या रेटिंगमध्ये सुधारणा केल्यानंतर निर्माण झालेल्या उत्साहवर्धक वातावरणाचा सर्वाधिक लाभ धातू आणि आरोग्य क्षेत्राला झाला. या क्षेत्रात १ आॅक्टोबरसाठी सर्वाधिक डेरिव्हेटिव्ह करार झाले. त्याचा लाभ बाजाराला झाला.
बँकिंग क्षेत्रात एसबीआयचे शेअर्स सर्वाधिक २.७१ टक्क्यांनी वाढले. त्यापाठोपाठ अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यांनाही लाभ झाला.
डॉ. रेड्डीज लॅब, बजाज आॅटो, भारती एअरटेल, गेल, हीरो मोटोकॉर्प, हिंद युनिलिव्हर आणि आयटीसी यांना मात्र फटका बसला.
सेन्सेक्समधील ३0 पैकी १९ कंपन्यांना तेजीचा लाभ मिळाला, तर ११ कंपन्या तोट्यातच राहिल्या. विभागवार तुलना पाहता बीएसई धातू निर्देशांकाने सर्वाधिक २.४९ टक्क्यांनी वाढला. रिअल्टीने २.२७ टक्के, तर सार्वजनिक क्षेत्राने २.१९ टक्क्यांची वाढ नोंदविली. (प्रतिनिधी)

Web Title: Sensex recovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.