मुंबई - पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सत्ताधारी भाजपाविरोधात आलेले कल आणि आरबीआयचे प्रमुख उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यामुळे सुरुवातीच्या सत्रात कोसळलेला शेअर बाजार दुपारनंतर सावरला. सकाळी सुरुवातीच्या काळात 500 हून अधिक अंकांनी कोसळलेल्या शेअर बाजाराने दुपारी अडीच वाजेपर्यंत 119 अंकांनी उसळी घेतली. दरम्यान, निफ्टीमध्येही सुधारणा झाली असून, 42.5 अंकांनी निफ्टची वधारला आहे.
मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी भाजपा पिछाडीवर पडल्याचे मोठे पडसाद शेअर बाजारात उमटले होते. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या मोठ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठी घसरण होऊन सेंसेक्स 500 हून अधिक अंकांनी घसरला. तर दिवसाच्या सुरुवातीला डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरला होता.
दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीला कालही शेअर बाजारात मोठी पडझड झाली होती. सोमवारी व्यवहारांना सुरुवात झाल्यावर मुंबई शेअरबाजाराचा संवेदनशील सूचकांक असलेल्या सेंसेक्समध्ये मोठी पडझड झाली. भागधारकांनी विक्रीचा धडाका लावल्याने सेंसेक्स 609.58 अंकांनी घसरला. तर निफ्टीमध्येही 187 आंकांनी घसरण झाली होती.
सुरुवातीच्या धक्क्यातून शेअर बाजार सावरला, सेंसेक्स 231 अंकांनी वधारला
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सत्ताधारी भाजपाविरोधात आलेले कल आणि आरबीआयचे प्रमुख उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यामुळे सुरुवातीच्या सत्रात कोसळलेला शेअर बाजार दुपारनंतर सावरला.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 03:22 PM2018-12-11T15:22:06+5:302018-12-11T15:29:56+5:30