मुंबई : ग्रीसमधील जनतेने युरोपीय संघांच्या अटींच्या विरोधात मतदान केल्यानंतर निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीवर मात करीत भारतीय शेअर बाजारांनी तेजी नोंदविली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११५.९७ अंकांनी वाढून २८,२0८.७६अंकांवर बंद झाला.आरोग्य, तेल आणि गॅस, रिअल्टी आणि ग्राहक वस्तू या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी चांगली कामगिरी केल्यामुळे बाजार वाढला. खरे तर सकाळी बाजारात मंदीचे वातावरण होते. सेन्सेक्स ३१७ अंकांनी घसरला होता. नंतर मात्र त्याने सर्व हानी भरून काढून वाढीची नोंद केली. सेन्सेक्स सकाळी २७,८५७.२0 अंकांवर उघडला होता. त्यानंतर तो आणखी घसरून २७,७७४.८0 अंकांपर्यंत खाली गेला होता. त्यानंतर त्याने उसळी घेतली. २८ हजार अंकांचा टप्पा ओलांडून तो २८,२३५.३१ अंकांपर्यंत वर चढला. सत्राच्या अखेरीस २८,२0८.७६ अंकांवर बंद होताना सेन्सेक्सने ११५.९७ अंकांची अथवा 0४१ टक्क्यांची वाढ मिळविली. आदल्या सत्रात सेन्सेक्स १४६.९९ अंकांनी वाढला होता.५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी ८,५00 अंकांच्या पुढे गेला आहे. ३७.२५ अंकांची अथवा 0.४४ टक्क्यांची वाढ नोंदवून निफ्टी ८,५२२.१५ अंकांवर बंद झाला. त्या आधी तो ८,३८६.१५ आणि ८,५३३.१५ अंकांच्या मध्ये खालीवर होताना दिसून आला.आजची तेजी व्यापक होती. स्मॉलकॅप आणि मीडकॅप निर्देशांक अनुक्रमे १.0९ टक्के आणि 0.८५ टक्के वाढले. तत्पूर्वी शुक्रवारी विदेशी संस्थांनी ३५५.२९ कोटी रुपयांची समभाग खरेदी केली.जागतिक बाजारात घसरणीचा कल दिसून आला. आशियाई बाजार घसरले. युरोपीय बाजारातही सकाळी नरमाईचा कल दिसत होता. ग्रीसच्या अनिश्चिततेचा परिणाम बाजारांवर झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)> ३0 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्समधील डॉ. रेड्डीजला तेजीचा सर्वाधिक ३.६४ टक्क्यांचा लाभ झाला. कंपनीचा समभाग ३,७११.७५ रुपयांवर बंद झाला. ३.३५ टक्क्यांच्या वाढीसह सिप्ला दुसऱ्या स्थानावर राहिली. > हीरो मोटोकॉर्पस्, टीसीएस, एचडीएफसी बँक, लुपिन आणि सन फार्मा या कंपन्यांचे समभागही वाढले. वेदांता, हिंदाल्को, एनटीपीसी, टाटा स्टील आणि इन्फोसिस या बड्या कंपन्यांचे समभाग मात्र घसरले.
सेन्सेक्सने घेतली ११६ अंकांची उसळी
By admin | Published: July 06, 2015 10:34 PM