Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स २६५ अंकांनी उसळला

सेन्सेक्स २६५ अंकांनी उसळला

इराण आणि पाश्चात्त्य देशांतील अणुकरारामुळे भारताला तेल आयातीत लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे शेअर बाजारात तेजी परतली. सेन्सेक्स २६५ अंकांनी

By admin | Published: July 16, 2015 04:42 AM2015-07-16T04:42:59+5:302015-07-16T04:42:59+5:30

इराण आणि पाश्चात्त्य देशांतील अणुकरारामुळे भारताला तेल आयातीत लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे शेअर बाजारात तेजी परतली. सेन्सेक्स २६५ अंकांनी

Sensex rises 265 points | सेन्सेक्स २६५ अंकांनी उसळला

सेन्सेक्स २६५ अंकांनी उसळला

मुंबई : इराण आणि पाश्चात्त्य देशांतील अणुकरारामुळे भारताला तेल आयातीत लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे शेअर बाजारात तेजी परतली. सेन्सेक्स २६५ अंकांनी वाढून पुन्हा एकदा २८ हजार अंकांच्या पातळीवर गेला आहे. निफ्टीही ८,५२३.८0 अंकांवर पोहोचला आहे. याबरोबर निफ्टी तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
विदेशी संस्थांनी बाजारात जोरात खरेदी केल्याचे दिसून आले. त्याचाही लाभ निर्देशांकांना मिळाला. तत्पूर्वी काल विदेशी संस्थांनी २७0 कोटी रुपयांची समभाग खरेदी केल्याचे हंगामी आकडेवारीतून दिसून
आले.
अणुकरारामुळे इराणवरील निर्बंध उठणार आहेत. त्यामुळे तेलाच्या किमती खाली येतील. त्याचा थेट लाभ भारताला मिळेल. त्यामुळेच अणुकराराच्या बातमीने भारतीय शेअर बाजारांत तेजी अवतरली. सेन्सेक्स सकाळी २८,0२२.१४ अंकांवर मजबुतीसह उघडला. त्यानंतर तो आणखी वर चढला. सत्राच्या अखेरीस २८,१९८.२९ अंकांवर बंद झाला. २६५.३९ अंकांची अथवा 0.९५ टक्क्यांची वाढ त्याने प्राप्त केली.
५0 कंपन्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ६९.७0 अंकांची अथवा 0.८२ टक्क्यांची झेप घेतली. सत्राच्या अखेरीस तो ८,५२३.८0 अंकांवर बंद झाला. १७ एप्रिलनंतरची निफ्टीची ही सर्वोच्च पातळी आहे. त्या दिवशी निफ्टी ८,६0६ अंकांवर बंद झाला होता.
बाजारातील आजच्या तेजीचे नेतृत्व वाहन, आयटी आणि तंत्रज्ञान विषयक कंपन्यांनी केले. ३0 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्समधील २७ कंपन्यांचे समभाग वाढले. मारुती सुझुकीचा समभाग सत्रादरम्यान ४,१८२ रुपयांवर गेला होता. ही त्याची सार्वकालिक सर्वोच्च पातळी ठरली. सत्राच्या अखेरीस २.६३ टक्क्यांची वाढ नोंदवून तो ४,१५५ अंकांवर बंद झाला.
टाटा मोटर्स, विप्रो, टीसीएस, एमअँडएम, लुपिन, एचडीएफसी, आरआयएल, इन्फोसिस, सन फार्मा आणि बजाज आॅटो यांचे समभागही वाढले.
बाजाराची एकूण व्याप्ती मजबूत राहिली. १,५३९ कंपन्यांचे समभाग वाढले. १,२८0 कंपन्यांचे समभाग घसरले. १४४ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल मात्र घसरून २,७५0.१४ कोटी झाली. काल ती २,९0८.९५ कोटी
होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Sensex rises 265 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.