मुंबई : अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याज दर जैसे थे ठेवल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे २६६ अंकांनी उसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही वाढून ८,८00 अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स २६५.७१ अंकांनी अथवा 0.९३ टक्क्यांनी वाढून २८,७७३.१३ अंकांवर बंद झाला. ९ सप्टेंबरनंतरचा हा सर्वांत मोठा बंद ठरला. त्या दिवशी सेन्सेक्स २८,७९७.२५ अंकांवर बंद झाला होता. ५0 कंपन्यांचा निफ्टी ९0.३0 अंकांनी वाढून ८,८६७.४५ अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्सची २६६ अंकांची उसळी
By admin | Published: September 23, 2016 1:45 AM