Join us

सेन्सेक्सने घेतली २९९ अंकांची उसळी

By admin | Published: March 17, 2015 11:59 PM

जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीचा लाभ मंगळवारी भारतीय शेअर बाजारांना मिळाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९८.६७ अंकांनी उसळून २८,७३६.३८ अंकांवर बंद झाला.

मुंबई : जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीचा लाभ मंगळवारी भारतीय शेअर बाजारांना मिळाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९८.६७ अंकांनी उसळून २८,७३६.३८ अंकांवर बंद झाला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून इतक्यात व्याजदरवाढ केली जाणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे शेअर बाजारात जान आली आहे. तरीही दिवसभर बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. त्यानंतर तो ३४५ अंकांनी वर चढला होता. मात्र, नंतर अचानक विक्रीचा जोर वाढला. त्याचा परिणाम होऊन सेन्सेक्स २८,४३५.४५ अंकांपर्यंत खाली घसरला. शेवटच्या एक तासात मात्र सेन्सेक्स पुन्हा उसळला. २९८.६७ अंकांच्या तेजीसह २८,७३६.३८ अंकांवर तो बंद झाला. ही उसळी १.0५ टक्के इतकी आहे. गेल्या दोन व्यावसायिक सत्रांत सेन्सेक्स ४९२.७0 अंकांनी अथवा १.७0 टक्क्यांनी घसरला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९0.१५ अंकांनी अथवा १.0४ टक्क्यांनी वाढून ८,७२३.३0 अंकांवर बंद झाला. सन फार्माचे बाजारमूल्य एसबीआयपेक्षा अधिकऔषधी कंपनी सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजने बाजारातील समभाग मूल्यांकनाच्या बाबतीत देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाला मंगळवारी मागे टाकले.मुंबई शेअर बाजारात दुपारच्या सत्रात सन फार्माच्या बाजार मूल्यांकनात १ टक्क्याची वाढ झाली. त्याबरोबर कंपनीचे बाजार मूल्य २,१५,३९४.८२ कोटी झाले. त्याच वेळी स्टेट बँक आॅफ इंडियाचे बाजार मूल्य २,0९,४८८.४१ कोटी होते. स्टेट बँकेचा समभाग 0.४८ टक्क्यांनी घसरून २८0.३0 रुपयांवर आला. सन फार्मा बाजार मूल्यांकनाच्या बाबतीत सर्वोच्च १0 कंपन्यांत आठव्या स्थानी आली आहे. एसबीआय आता नवव्या स्थानावर आहे. टीसीएस पहिल्या स्थानी आहे. टीसीएसचे बाजार मूल्य ५,0४,0६८.८५ कोटी रुपये आहे. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, सीआयएल, सन फार्मा, एसबीआय आणि एचडीएफसी यांचा क्रमांक लागतो. ४सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 पैकी २३ कंपन्यांचे समभाग वाढले. औषधी आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांना तेजीचा सर्वाधिक लाभ मिळाला.४डॉ. रेड्डीज लॅब, सिप्ला आणि सन फार्मा या औषधी कंपन्यांचे समभाग वाढले. याशिवाय हिंदाल्को, सेसा स्टरलाईट, एचडीएफसी, टाटा मोटर्स, भेल, एलअँडटी, अ‍ॅक्सिस बँक, टाटा स्टील, आरआयएल, एलटीसी, एमअँडएम, एनटीपीसी आणि आयसीआयसीआय बँक या कंपन्यांचे समभागही वाढले. ४दरम्यान, विदेशी गुंतवणूकदारांनी काल ७६२.५५ कोटी रुपयांचे समभाग विकले. तात्पुरत्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली.