Lokmat Money > बिझनेस न्यूज > केंद्र सरकारने बँकांसाठी मोठे भांडवलीकरण पॅकेज जाहीर केल्यानंतर बाजारात तेजी, सेन्सेक्स ४३५ अंक ांनी उसळला

केंद्र सरकारने बँकांसाठी मोठे भांडवलीकरण पॅकेज जाहीर केल्यानंतर बाजारात तेजी, सेन्सेक्स ४३५ अंक ांनी उसळला

मुंबई : केंद्र सरकारने बँकांसाठी मोठे भांडवलीकरण पॅकेज जाहीर केल्यानंतर, बुधवारी शेअर बाजारांनी जबरदस्त उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स प्रथमच ३३ हजार अंकांच्या वर बंद झाला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:03 AM2017-10-26T04:03:51+5:302017-10-26T04:03:59+5:30

मुंबई : केंद्र सरकारने बँकांसाठी मोठे भांडवलीकरण पॅकेज जाहीर केल्यानंतर, बुधवारी शेअर बाजारांनी जबरदस्त उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स प्रथमच ३३ हजार अंकांच्या वर बंद झाला.

Sensex rises 435 points after the central government announced big capitalization packages for banks | केंद्र सरकारने बँकांसाठी मोठे भांडवलीकरण पॅकेज जाहीर केल्यानंतर बाजारात तेजी, सेन्सेक्स ४३५ अंक ांनी उसळला

केंद्र सरकारने बँकांसाठी मोठे भांडवलीकरण पॅकेज जाहीर केल्यानंतर बाजारात तेजी, सेन्सेक्स ४३५ अंक ांनी उसळला

मुंबई : केंद्र सरकारने बँकांसाठी मोठे भांडवलीकरण पॅकेज जाहीर केल्यानंतर, बुधवारी शेअर बाजारांनी जबरदस्त उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स प्रथमच ३३ हजार अंकांच्या वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारानेही नवा उच्चांक केला.
३० कंपन्यांचा सेन्सेक्स ४३५.१६ अंकांनी अथवा १.३३ टक्क्याने वाढून ३३,०४२.५० अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा सार्वकालिक उच्चांकी बंद ठरला. १६ आॅक्टोबरचा ३२,६३३.६४ अंकांवरील बंदचा उच्चांक सेन्सेक्सने मोडला. याशिवाय २५ मे नंतरची सर्वाधिक एकदिवसीय वाढही आज सेन्सेक्सने नोंदविली. २५ मे रोजी सेन्सेक्स ४४८.३९ अंकांनी वाढला होता. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्स २२४ अंकांनी वाढला होता.
राष्टÑीय शेअर बाजाराचा निफ्टी ८७.६५ अंकांनी वाढून १०,२९५.३५ अंकावर बंद झाला. निफ्टीचाही हा सार्वकालिक उच्चांकी बंद ठरला. १७ आॅक्टोबरचा १०,२३४.४५ अंकांवरील बंदचा उच्चांक निफ्टीने मोडला.
सरकारने बँकिंग क्षेत्रासाठी घसघशीत पॅकेज जाहीर केल्यामुळे बँकिंग क्षेत्रातील समभागांनी जोरदार उसळी घेतली. सेन्सेक्समधील एसबीआयचे समभाग सर्वाधिक २७.५८ टक्क्यांनी वाढले. आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक यांचे समभाग १४.६९ टक्क्यांपर्यंत वाढले. तेजीचा लाभ झालेल्या अन्य बँकांत पीएनबी, कॅनरा बँक, बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया, महाराष्ट्र बँक, अलाहाबाद बँक, आयडीबीआय बँक, सिंडिकेट बँक यांचा समावेश आहे. रस्ते बांधणी क्षेत्रातील बिल्डर्स कंपन्यांनाही तेजीचा चांगला लाभ झाला. अशोका बिल्डकॉन, सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आणि जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स यांचा त्यात समावेश आहे. या कंपन्यांचे समभाग ८.७१ टक्क्यांपर्यंत वाढले.
>अनेकांना फायदा
आजची तेजी व्यापक होती. बँकांप्रमाणेच अन्य क्षेत्रांतील कंपन्यांचे समभागही वाढीसह बंद झाले. एलअँडटी, भारती एअरटेल, अदानी पोर्टस्, टाटा मोटर्स, एमअँडएम, इन्फोसिस, विप्रो, आयटीसी, एनटीपीसी, बजाज आॅटो, रिलायन्स इंडस्ट्रिज, ओएनजीसी, हीरो मोटोकॉर्प, हिंदुस्तान युनिलिव्हर, पॉवर ग्रीड या कंपन्यांचे समभाग ५.६५ टक्क्यांपर्यंत वाढले.
व्यापक बाजारात संमिश्र कल पाहायला मिळाला. मिडकॅप निर्देशांक ०.४२ टक्क्यांनी वाढला. मात्र, स्मॉलकॅप निर्देशांक ०.१९ टक्क्याने घसरला.

Web Title: Sensex rises 435 points after the central government announced big capitalization packages for banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.