Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीन, अमेरिकेतील तेजीमुळे सेन्सेक्स वाढला

चीन, अमेरिकेतील तेजीमुळे सेन्सेक्स वाढला

चीन आणि अमेरिकेतील शेअर बाजारांत सुधारणा झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारांत बुधवारी तेजीचे वातावरण राहिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५८.0४ अंकांनी वाढून

By admin | Published: September 17, 2015 01:11 AM2015-09-17T01:11:07+5:302015-09-17T01:11:07+5:30

चीन आणि अमेरिकेतील शेअर बाजारांत सुधारणा झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारांत बुधवारी तेजीचे वातावरण राहिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५८.0४ अंकांनी वाढून

Sensex rises in China, US boom | चीन, अमेरिकेतील तेजीमुळे सेन्सेक्स वाढला

चीन, अमेरिकेतील तेजीमुळे सेन्सेक्स वाढला

मुंबई : चीन आणि अमेरिकेतील शेअर बाजारांत सुधारणा झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारांत बुधवारी तेजीचे वातावरण राहिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५८.0४ अंकांनी वाढून २५,९६३.९७ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सचा हा दोन आठवड्यांचा उच्चांक ठरला आहे. व्यापक आधारावरील एनएसई निफ्टी ७0.0५ अंकांनी वाढून ७,८९९.१५ अंकांवर बंद झाला आहे.
अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या बुधवारपासून सुरू होणाऱ्या दोन दिवशीय बैठकीतील निर्णयाकडे आता गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढीचा निर्णय घेऊ शकते, असे सांगितले जात आहे. असे झाल्यास तब्बल १ दशकानंतर अमेरिकेत प्रथमच व्याजदर वाढतील.
दुसरीकडे भारतीय रिझर्व्ह बँकेचा पतधोरण आढावा २९ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. या आढाव्यात व्याजदरात कपात केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे बाजारातील धारणा मजबूत होण्यास मदत झाली.मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी सकारात्मक होता. त्यानंतर तो आणखी वर चढला. दुपारी २६ हजारांचा टप्पा ओलांडून तो २६,00६.७५ अंकांवर पोहोचला होता. त्यानंतर नफा वसुली सुरू झाल्यामुळे ही गती कायम राखणे त्याला जमले नाही.

Web Title: Sensex rises in China, US boom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.