Join us

जागतिक तेजीने सेन्सेक्स वाढला

By admin | Published: October 24, 2015 4:30 AM

जागतिक बाजारातील तेजीच्या बळावर भारतीय शेअर बाजारांत शुक्रवारी वाढ पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १८३ अंकांनी वाढून २७,४७0.८१ अंकांवर बंद

मुंबई : जागतिक बाजारातील तेजीच्या बळावर भारतीय शेअर बाजारांत शुक्रवारी वाढ पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १८३ अंकांनी वाढून २७,४७0.८१ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सचा हा दोन महिन्यांचा उच्चांक ठरला आहे. याचबरोबर सेन्सेक्सने सलग चौथ्या आठवड्यात वाढीची नोंद केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सेन्सेक्स घसरत होता. शुक्रवारी या घसरणीला ब्रेक लागला. आशियाई बाजार वाढीसह बंद झाले. तसेच युरोपीय बाजारांची सुरुवात तेजीनेच झाली. याचा लाभ भारतीय बाजारांना मिळाला.३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स २७,५५५.0६ अंकांपर्यंत झेपावला होता. तथापि, ब्ल्यूचिप कंपन्यांत नफा वसुली सुरू झाल्यामुळे तो सत्राच्या अखेरीस १८३.१५ अंकांच्या अथवा 0.६७ टक्क्यांच्या वाढीसह २७,४७0.८१ अंकांवर बंद झाला. २0 आॅगस्ट रोजी सेन्सेक्स या पातळीवर होता. या आधीच्या तीन सत्रांत सेन्सेक्सने ७७.२६ अंक गमावले होते. काल दसऱ्यानिमित्त शेअर बाजार बंद होते. व्यापक आधारावरील एनएसई निफ्टीने ८,३00 अंकांची पातळी पुन्हा प्राप्त केली होती. तथापि, नंतर त्यात थोडी घसरण झाली. सत्राच्या अखेरीस ४३.७५ अंकांची अथवा 0.५३ टक्क्यांची वाढ नोंदवून निफ्टी ८,२९५.४५ अंकांवर बंद झाला. या आठवड्यात सेन्सेक्स २५६.२१ अंकांनी म्हणजेच 0.९४ टक्क्यांनी, तर निफ्टी ५७.३0 अंकांनी म्हणजेच 0.६९ टक्क्यांनी वाढला आहे. आयटीसी आणि अ‍ॅक्सिस बँकेचे समभाग सर्वाधिक २.८१ टक्क्यांनी वाढले. याशिवाय गेल, एनटीपीसी, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभागही वाढले. सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी २0 कंपन्यांचे समभाग तेजीत असल्याचे दिसून आले. १0 कंपन्यांचे समभाग घसरले. घसरलेल्या कंपन्यांत भारती एअरटेल, वेदांता आणि एलअँडटी यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)