Join us  

एफडीआयचे नियम शिथिल केल्यामुळे सेन्सेक्स २४१ अंकांनी वधारला

By admin | Published: June 20, 2016 6:16 PM

दिवसाच्या सुरुवातीला घसरलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवस संपताना २४१ अंकांनी वधारला.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २० - दिवसाच्या सुरुवातीला घसरलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवस संपताना २४१ अंकांनी वधारला. नागरी हवाई उड्डयाण, संरक्षण आणि फार्मा क्षेत्रातील परकीय गुंतवणूकीचे नियम शिथिल करुन मोदी सरकारने १०० टक्के गुंतवणूकीची परवनागी दिल्याने शेअर बाजारात चैतन्य आले आणि सेन्सेक्स २४१ अंकांनी वधारला. 
 
रघुराम राजन दुसरी टर्म स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सकाळी बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्समध्ये घसरण झाली होती. दिवसाच्या सुरुवातील सेन्सेक्समध्ये १७८ अंकांची घसरण होऊन सेन्सेक्स २६,४४७ पर्यंत पोहोचला होता. दिवसअखेर सेन्सेक्स २६,८६६ अंकांवर बंद झाला.