मुंबई : दोन महिन्यांच्या नीचांकावर गेलेल्या शेअर बाजारात गुरुवारी पुन्हा एकदा जान आली. आशियाई बाजारातील तेजीमुळे भारतीय बाजारांतही खरेदी वाढली. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३५९.४0 अंकांनी उसळला.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या इतिवृत्ताची बाजाराला प्रतीक्षा होती. ते समोर आले आहे. फेडरल रिझर्व्ह डिसेंबरमध्ये व्याजदरात वाढ करू शकेल, असे संकेत त्यातून मिळाले आहेत. अमेरिकेतील व्याजदर वाढीचा बँकिंग क्षेत्राला लाभ होऊ
शकतो. तसेच या महिन्यात दरवाढ होणार नाही, हेही स्पष्ट झाले आहे. या इतिवृत्तामुळे शेअर बाजारांनी नि:श्वास टाकला. ५ वर्षांपासून निर्यात करणाऱ्यांसाठी ३ टक्के व्याज सबसिडी देण्याची घोषणा काल केंद्र सरकारने केली होती. त्यामुळे बाजार धारणा मजबूत झाली. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी २५,६४0.३४ अंकांवर तेजीसह उघडला होता. सत्राच्या अखेरीस तो आणखी वर चढून ३५९.४0 अंकांच्या अथवा १.४१ टक्क्याच्या वाढीसह २५,८४१.९२ अंकांवर बंद झाला. ५ आॅक्टोबरनंतरची ही सर्वांत मोठी एकदिवसीय वाढ ठरली आहे. काल सेन्सेक्सनने ३८१.९५ अंक गमावले होते. व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,८00 अंकांचा टप्पा ओलांडून वर गेला आहे.
सेन्सेक्स ३५९ अंकांनी उसळला
दोन महिन्यांच्या नीचांकावर गेलेल्या शेअर बाजारात गुरुवारी पुन्हा एकदा जान आली. आशियाई बाजारातील तेजीमुळे भारतीय बाजारांतही खरेदी वाढली. त्यामुळे मुंबई शेअर
By admin | Published: November 20, 2015 01:49 AM2015-11-20T01:49:53+5:302015-11-20T01:49:53+5:30