Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स झेपावला

सेन्सेक्स झेपावला

थेट विदेशी गुंतवणुकीसंदर्भातील धोरणात्मक निर्णय आणि युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडण्याची चिंता काहीशी कमी झाल्याने संस्थात्मक गुंतवणुकदारांनी खरेदीवर जोर दिल्याने भारतीय शेअर बाजारात उत्साह संचारला.

By admin | Published: June 21, 2016 07:40 AM2016-06-21T07:40:27+5:302016-06-21T07:40:27+5:30

थेट विदेशी गुंतवणुकीसंदर्भातील धोरणात्मक निर्णय आणि युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडण्याची चिंता काहीशी कमी झाल्याने संस्थात्मक गुंतवणुकदारांनी खरेदीवर जोर दिल्याने भारतीय शेअर बाजारात उत्साह संचारला.

Sensex shifts | सेन्सेक्स झेपावला

सेन्सेक्स झेपावला

मुंबई : थेट विदेशी गुंतवणुकीसंदर्भातील धोरणात्मक निर्णय आणि युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडण्याची चिंता काहीशी कमी झाल्याने संस्थात्मक गुंतवणुकदारांनी खरेदीवर जोर दिल्याने भारतीय शेअर बाजारात उत्साह संचारला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसअखेर २४१.०१ अंकानी झेपावत दिवसअखेर २६,८६६.९२ अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजारही (निफ्टी) तेजीने दरवळत ६८.३० अंकानी वधारत दिवसअखेर ८,२३८.५० वर पोहोचला. रघुराम राजन यांनी दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर न होण्याचा निर्णय घेतल्याने भारताच्या पत मानांकनांवर परिणाम होईल, ही शंका दूर करताना ‘फिच’ या जागतिक मानांकन संस्थेने स्पष्ट केले की, आर्थिक आघाडीवर वैयक्तिक नव्हेंतर धोरणे महत्त्वपूर्ण असतात. त्यामुळेही शेअर बाजाराला बळ मिळाले. बीएसई-३० निर्देशांकाची सुरुवात घसरणीने झाली. सुरुवातीलाच १७९ अंकानी घसरत शेअर बाजाराचा निर्देशांक २६,४४७.८८ वर होता. (प्रतिनिधी)

Web Title: Sensex shifts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.