मुंबई : अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालाबाबत सावध भूमिकेत असलेल्या गुंतवणूकदारांनी खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे १५६ अंकांनी घसरून २७,२७४.१५ अंकांवर बंद झाला. हा बाजाराचा चार महिन्यांचा नीचांक ठरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही खाली आला.
संवत २0७३मधील पहिला सप्ताह शुक्रवारी संपला. या सप्ताहात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांना अनुक्रमे ६६७.३६ अंकांची अथवा २.३८ टक्क्यांची व २0४.२५ अंकांची अथवा 0.३६ टक्क्यांची घसरण सोसावी लागली. जेनरिक औषधी बनविणाऱ्या भारतीय कंपन्यांची अमेरिकेत चौकशी होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर औषधी कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरले.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स गेल्या चार सत्रांत ५११.२३ अंकांनी घसरला होता.
>सेन्सेक्समधील
१८ कंपन्यांचे समभाग घसरले. त्याचवेळी १२ कंपन्यांचे समभाग वाढले. सनफार्मा, डॉ. रेड्डी, लुपीन आणि सिप्ला या कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला. औषधी कंपन्यांच्या व्यतिरिक्त कोल इंडिया, हीरो मोटोकॉर्प, आरआयएल, एलअँडटी, मारुती, एचडीएफसी, एसबीआय यांचे समभाग घसरले.
>आशियाई बाजारांतही घसरणीचाच कल राहिला. जपानचा निक्केई १.३४ टक्क्यांनी, शांघाय कंपोजिट 0.१२ टक्क्यांनी, तर हाँगकाँगचा हँग सेंग 0.१८ टक्क्यांनी खाली आला. युरोपीय बाजारांत सकाळी नरमाईचा कल होता. फ्रँकफूर्टचा डॅक्स-३0 निर्देशांक 0.४ टक्के, पॅरिसचा कॅक 0.२ टक्के, तर लंडनचा एफटीएसई 0.७ टक्के घसरण दर्शवित होता.
सेन्सेक्स आणखी १५६ अंकांनी घसरला
गुंतवणूकदारांनी खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे १५६ अंकांनी घसरून २७,२७४.१५ अंकांवर बंद झाला.
By admin | Published: November 5, 2016 04:14 AM2016-11-05T04:14:25+5:302016-11-05T04:14:25+5:30