Highlights कॉर्पोरेट टॅक्स घटवण्याची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणाअर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरणसेंसेक्स 1600 आंकांनी तर निफ्टी 451.90 अंकांनी उसळला
मुंबई - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योग जगताला दिलासा देताना कॉर्पोरेट टॅक्स घटवण्याची घोषणा केली असून, अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर तात्काळ मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील सूचकांक सेंसेक्स मोठ्या प्रमाणात वधारला आहे. या घोषणेनंतर सेंसेक्सने 1600 अंकांनी तर निफ्टीने 451.90 अंकांनी उसळी घेतली आहे.
Sensex soars over 1600 points, currently at 37,767.13 pic.twitter.com/ZB34RnacSP
— ANI (@ANI) September 20, 2019
गोवा येथे होत असलेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी उद्योग जगताला मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. कंपन्या आणि व्यावसायिकांना दिलासा देताना कॉर्पोरेट टॅक्स घटवण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. कॉर्पोरेट टॅक्स घटवण्यासाठीचा अध्यादेश पारित झालेला आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली.
निर्मला सीतारामन यांनी पुढे सांगितले की, ''मेक इन इंडियाला प्रोत्साहित करण्यासाठी प्राप्तिकर कायद्यामध्ये काही नव्या तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. या तरतुदींनुसार 1 ऑक्टोबर 2019 नंतर स्थापना झालेली कुठलीही नवी देशांतर्गत कंपनी आणि जी कंपनी नव्याने गुंतवणूक करत असेल. त्यांना 15 टक्के दराने प्राप्तिकर आकारण्यात येईल.
अशा कंपनीने 31 मार्च 2023 पूर्वी उत्पादन सुरू केल्यास अशा कंपनीवर 15 टक्के कर आकारला जाईल. तसेच सर्वप्रकारचे सरचार्ज आणि सेसवर 17.10 टक्के इतका दर राहील.