Lokmat Money > बिझनेस न्यूज > Sensex Update : सेन्सेक्सने ओलांडला ४१ हजारांचा टप्पा

Sensex Update : सेन्सेक्सने ओलांडला ४१ हजारांचा टप्पा

Sensex Update : मुंबई शेअर बाजारामध्ये मंगळवारी संवेदनशील निर्देशांकाने (सेन्सेक्स) प्रथमच ४१ हजार अंशांची पातळी ओलांडून नवीन उच्चांक नोंदविला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 04:06 AM2019-11-27T04:06:50+5:302019-11-27T04:07:24+5:30

Sensex Update : मुंबई शेअर बाजारामध्ये मंगळवारी संवेदनशील निर्देशांकाने (सेन्सेक्स) प्रथमच ४१ हजार अंशांची पातळी ओलांडून नवीन उच्चांक नोंदविला.

Sensex surpasses 41,000 mark | Sensex Update : सेन्सेक्सने ओलांडला ४१ हजारांचा टप्पा

Sensex Update : सेन्सेक्सने ओलांडला ४१ हजारांचा टप्पा

मुंबई : मुंबई शेअर बाजारामध्ये मंगळवारी संवेदनशील निर्देशांकाने (सेन्सेक्स) प्रथमच ४१ हजार अंशांची पातळी ओलांडून नवीन उच्चांक नोंदविला. दिवसाच्या अखेरच्या सत्रामध्ये नफा कमविण्यासाठी झालेल्या विक्रीमुळे हा निर्देशांक ४१ हजारांच्या खाली येऊन बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक असलेल्या निफ्टीनेही प्रथमच १२ हजार अंशांचा टप्पा पार केला. दिवसअखेरीसही तो १२ हजारांच्या वरच बंद झाला हे विशेष!

सोमवारी विक्रमी उंचीवर बंद झालेला मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक मंगळवारी खुला झाला, तोच मुळी ४१,०२२.८५ अंशांवर. त्यानंतरही तो वरच्या दिशेने झेपावत होता. त्याने ४१,१२०.२८ पर्यंत मजल मारली. त्यानंतर बाजारात विक्रीचा जोर सुरू झाला. नफा कमविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात आली. त्यामुळे हा निर्देशांक ४०,७१०.२० अंशांपर्यंत खाली घसरला. मात्र बाजार बंद होताना काही प्रमाणात खरेदी झाल्यामुळे तो थोडासा वाढून ४०,८२१.३० अंशांवर बंद झाला. सोमवारच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेमध्ये तो ६७.९३ अंश खाली आला.

राष्ट्रीय शेअर बाजारही मंगळवारी सकाळी चांगलाच जोरात होता. येथील निर्देशांक (निफ्टी)ही प्रथमच १२ हजार अंशांची पातळी ओलांडून गेला. त्यानंतरही त्यामध्ये वाढ होत तो १२,१३२.४५ अंशांपर्यंत पोहोचला. हा निफ्टीचा उच्चांक आहे. यानंतर विक्रीचा दबाव येत असल्याने निफ्टी खाली आला. दिवसाच्या अखेरीस तो १२,०३७.७० अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये ३६.०५ अंशांची घट झाली.

ही आहेत वाढीची कारणे

बाजारामध्ये प्रमुख निर्देशांकांमध्ये असलेल्या सर्वच क्षेत्रांच्या आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेली खरेदी
सक्रिय झालेल्या परकीय वित्तसंस्थांकडून चालू महिन्यामध्ये झालेली मोठी खरेदी
अमेरिका व चीन यांच्यातील व्यापारयुद्धाबाबत दोन्ही देशांमध्ये समझोता होण्यात निर्माण झालेले आशादायक वातावरण
जगभरातील शेअर बाजारांमधील तेजी
तांत्रिक विश्लेषकांच्या मते बाजारामध्ये निर्माण झालेल्या वाढीच्या स्थितीमुळेही निर्देशांकाने मोठी भरारी घेतली

सेन्सेक्समध्ये कॅलेंडर वर्षामध्ये २१ टक्के वाढ

शेअर बाजाराचा निर्देशांक १ जानेवारी ते २५ नोव्हेंबर या काळात २१ टक्क्यांनी वाढला. याच काळात निफ्टी १६ टक्के वाढलेला दिसून आले. मात्र, मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे क्षेत्रीय निर्देशांक मात्र अनुक्रमे १६ आणि ३० टक्क्यांनी घटले आहे. याचाच अर्थ, बाजारात दिसणारी तेजी काही ठरावीक आस्थापनांत आहे.

Web Title: Sensex surpasses 41,000 mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.