Join us

Share Market Crash: शेअर बाजारात आज 'ब्लॅक फ्रायडे', बाजार उघडताच Sensex ९०० अंकांनी कोसळला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 10:18 AM

Share Market News Today | Sensex, Nifty, Share Prices: भारतीय शेअर बाजाराची आज निराशाजनक सुरुवात झाली आहे.

मुंबई-

Share Market News Today | Sensex, Nifty, Share Prices: भारतीय शेअर बाजाराची आज निराशाजनक सुरुवात झाली आहे. जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरणाचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही पाहायला मिळत आहे. आज सकाळी व्यवहार सुरु होताच सेन्सेक्सची पडझडीनं सुरुवात झाली. व्यवहाराची सुरुवात ७८३.६७ अंकांच्या घसरणीसह ५४,९१८.५६ अकांनी झाली. आता घसरण ९०० अंकांपर्यंत पोहोचली आहे. तर निफ्टीतही २५० हून अधिक अंकांनी घसरण झाली आहे. निफ्टीमध्ये ३०१.८० अंकांची घसरणीची नोंद झाली असून सध्या निफ्टी १६,३८०.९० वर व्यवहार करत आहे. 

मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये नकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. कारण निफ्टी मिडकॅप 100 जवळपास 2.38 टक्क्यांनी घसरला आणि स्मॉल कॅप 2.91 टक्क्यांनी घसरला आहे.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने संकलित केलेल्या 15 सेक्टर गेजपैकी सर्व रेड लाइनमध्ये व्यवहार करत होते. निफ्टी ऑटो, निफ्टी आयटी आणि निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स अनुक्रमे 2.09 टक्के, 2.32 टक्के आणि 2.55 टक्क्यांनी घसरणीसह ट्रेड करत आहेत. 

स्टॉकच्या पातळीवर पाहायचं झाल्यास सर्वाधिक फटका टाटा मोटर्सच्या शेअर्सला झाला आहे. टाटा मोटर्सचे शेअर्स ३.१० टक्क्यांच्या घसरणीसह ४१३.१० रुपयांवर आले आहेत. तर HCL Tech, UPL, Bajaj Finance आणि Wipro यांच्याही स्टॉकमध्ये नकारात्मक परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :निर्देशांकशेअर बाजारनिफ्टीशेअर बाजार