Join us  

सेन्सेक्स तीन महिन्यांच्या उच्चांकावर

By admin | Published: January 28, 2017 12:43 AM

गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७४.३२ अंकांनी अथवा 0.६३ टक्क्यांनी वाढून २७,८८२.४६ अंकांवर बंद

मुंबई : गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७४.३२ अंकांनी अथवा 0.६३ टक्क्यांनी वाढून २७,८८२.४६ अंकांवर बंद झाला. ३0 आॅक्टोबरनंतरचा हा उच्चांकी बंद ठरला. गेल्या तीन सत्रांत सेन्सेकस ६७३.६४ अंकांनी वाढला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३८.५0 अंकांनी अथवा 0.४५ टक्क्यांनी वाढून ८,६४१.२५ अंकांवर बंद झाला. या आठवड्यात सेन्सेक्स ८४७.९६ अंकांनी अथवा ३.१३ टक्क्यांनी, तर निफ्टी २९१.९0 अंकांनी अथवा ३.४९ टक्क्यांनी वाढला. २७ मे नंतरचा हा सर्वाधिक साप्ताहिक लाभ ठरला. सेन्सेक्समधील भारती एअरटेल, एनटीपीसी, मारुती सुझुकी, पॉवर ग्रीड, आरआयएल, इन्फोसिस, सन फार्मा, एमअँडएम, कोल इंडिया, ओएनजीसी, टीसीएस आणि टाटा स्टील यांचे समभाग वाढले. विप्रो आणि आयटीसी यांचे समभाग घसरले. (वाणिज्य प्रतिनिधी)